खूप दिवसानंतर पाहिले मी सरांना, दोन शब्द बोलण्याचे धाडस मला होईना, सरातील गुरुला, गुरुतील भावाला आणि भावांमधील एका निस्वार्थी कवीला, खूप भूमिका वटवण्याचे कौशल्य आहे या एकाच व्यक्तीत, प्रत्येक नाते ते अगदी मायेने जगतील, सुंदर अशा कविता करतात मनातील भावना कोऱ्या कागदावर उतरवतात सरांच्या कविता ऐकून मनात एक कळी उमलली, शब्दांची जवळजवळ करून कविता बनवली, पहिलीच कविता मी माझ्या बहिणीवर केली वाचून पाहिल्यानंतर तिला ती खूपच आवडली, मी कविता करते याच्यावर तिचा विश्वास बसेना, पुन्हा पुन्हा विचारत होती अगं खरं सांग ना, प्रथम मी माझे विचार कागदावर मांडले, या शब्दांना जणू वाहते वारीच भेटले, मी कविता करते ही बातमी क्लासमध्ये अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे पसरली, ऐकण्यासाठी प्रत्येक मैत्रिणीची मने आतुर झाली, माझे विचार सर्वांनाच खूपच आवडले कारण हे माझे रूप सर्वांनी प्रथमच पाहिली.