होतीस तू माहेरी तेव्हा; दिला मी तुला खूप त्रास मी केलेला प्रत्येक हट्ट तू पुरवलास, गेलीस तू सासरी ठेवूनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त तुझ्याच आठवणी, सुखदुःखाच्या चढा ओढीत कोणाचा तरी मायेचा हात होता, हा माझा खरा खुरा विश्वास होता, गेलीस सोडूनी मला ताई आठवणीने मन व्याकुळ होई, सत्याचा डोंगर होतीस, ज्ञानाचा दीप होतीस, सुखाचा उंबरा होतीस, प्रेमाचा सागर होतीस, तूच तू माझ्यासाठी माझे सर्वच होतीस, तू माझ्यासाठी माझे सर्वस्व होतीस, मला वळण लावणारी तू होतीस, मला घङवनारी फक्त तूच होतीस, माझ्या प्रत्येक problem च solution तू माझ्या प्रत्येक Tention च औषध तू ,माझ्या आवाजातील किंचीतसा फरक तू दूर असूनही ओळखतेस तूझ्याशी बोलल्यावर मी माझे सर्व दुःख विसरते, निरोप घेताना डोळ्यात अश्रू मावेनात किती केला तुला सोडून मला जावेना, गेलीस ती गेलीस विचारांची ठेवण ठेवून गेलीस, माळेतील मन्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात गुंफून गेलीस, नाते तुझे माझे सर्वांच्या हृदयात करून गेलीस, वेड्या बहिणीची वेडी ही माया सर येत नाही कशाशी त्याला, बस झाला तुझा हा बहाना हे आपल्या बहिणीला भेटायला, कसाविस होतो सारा जीव माझा, तुझ्या आठवणीने वेडापिसा, तुझ्या आठवणीने मन माझे सुखावते डोळ्यातील अश्रू मोत्यासारखे टपटते, एकही क्षण जात नाही तुझ्या आठवणी शिवाय कधीच करमत नाही तुला भेटल्याशिवाय, बहिणीचा नातं अतूट असत त्याच्या समोर सर्व काही फिक असतं, मी होते लहान तिने केले माझ्यावर चांगले संस्कार तुझ्याविना या स्वार्थी जगात सर्वत्र आहे अंधकार, म्हणूनच मी म्हणते ” तूम तो मेरी दिल में रहते हो मेरी धडकन सिर्फ तुझे याद करते है सच्चे दिल से खुदा से कुछ मांगा मेरी बहना को मेरे भी हिस्से की खुशिया दे देना”