कर्म तसेच फळ

स्वतःच्या कर्माचे फळ याच जन्म मिळते, चुकीच्या गोष्टी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य नेहमी बाहेरच राहते, कुकर्म कळत नकळत होत राहते परंतु सत्कर्म करावे लागते, दुःख संपेल तेव्हाच सुखाचा श्वास मिळेल वेळेच्या आधी मिळवण्याचा प्रयत्न कराल सुख तर प्रत्येक क्षणात सामावेल सारे दुःखच दुःख. प्रत्येकाला जीव हा असतो स्वतःवरून इतरांचा विचार करायचा असतो, ज्या गोष्टीवर दुसर्याचा हक्क आहे ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करायचा नसतो. सुखी जीवनात प्रयत्ना बरोबर धैर्याची जोड लागते तेव्हाच यशाची सीमा पार करता येते, तू जगशील जेव्हा दुसऱ्यांच्या हितासाठी तेव्हाच तुझ्यातील “मी पणा” संपेल आणि तेव्हाच तुला तुझ्या जगण्याचा अर्थ समजेल. जेव्हा होशील तू सद्दविचारी तेव्हाच येईल तुला खरी प्रचिती की तू प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी चा आहेस किती भिकारी, तुझ्या चैनीला तू तुझ्या गरजा मानतोस; तुझ्या जगण्याला तू नवा अर्थ लावतोस, जगाला घडवणं तुझ्या हातात नाही पण तू स्वतःला कसं घडवतोस त्याच्यावर तुझी पुढची पिढी अवलंबून आहे, इतरांना सुख देण्याचा प्रयत्न कर म्हणजे तू सुखी होशील, गरीब निराधार दिन दुबळ्यांना आधार ताकद दे म्हणजे तुझ्यात नवचैतन्य निर्माण होईल, न्यायासाठी लढ म्हणजे विजयी होशील, सत्यासाठी कधीही तुझे प्राण गेले तरी तू अमर होशील पण; तू शेवटच्या क्षणापर्यंत सदैव लढत लढत आणि लढतच रहा कारण जैसे कर्म करशिल तैसे फळ मिळेल.

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star