
आम्ही सावित्रीच्या लेकी घेऊन शिक्षणाचा वसा हाती समाजात घडवून आणू नवी क्रांती
स्त्रीच्या शौर्याची आली असेल तुम्हास प्रचिती
देशासाठी देते ती आपल्या प्राणाची आहुती
अन्याया विरुद्ध लढण्यासाठी घेते ती मशाल हाती
हिच आता आपली नवी भारतीय संस्कृती
तिच्या कर्तुत्वाने जागृत झाली ही धरती पुरूष जातीला पटली या स्त्रीच्या शौर्याची महती
शिक्षणाचा गंधही नसलेल्या स्त्रियांच्या कोमल जीवनात अंधश्रद्धेच्या काटेरी आणी खडतड प्रवासात घेऊन आल्या सावित्रीबाई आशेचे एक नवे किरण
याच किरणाच्या प्रकाशाने उजळून गेले त्यांचे जीवन
बंधनातून मुक्त करून शिकवले जीवन जगण्यास अन्याया विरुद्ध लढून न्याय मिळवण्यास
शिक्षणाची होती स्त्रीयांस बंदी सावित्रीबाईंनी कठोर परिश्रमाने मिळवून दिली अशी अनमोल संधी
अशिक्षित स्त्रिया शिक्षित झाल्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या, हे सर्व शक्य झाले या माऊलीच्या प्रयत्नाने म्हणूनच आजची स्त्री जगू लागली ताठ मानने
स्त्री ला यशाच्या शिखरावरती पोहोचवणारी ही सावित्री कितीही गायले तरी कमीच आहे या माऊलीची महती.
✍ सौ.शितल पाटील.
You must be logged in to post a comment.