वाद मनाशी

मन एवढं चंचल का असत, क्षणात वर्तमानाचा विचार करत, क्षणात भूतकाळ रमत तर क्षणात भविष्याचा हिशोब करत बसत सांगा ना; मन एवढ का चंचल असतं.

तुझ्याशी गप्पा मारता मारता मनाला लागेल असं काही बोलून गेलास, तू इथेच होतास मीही इथेच होते पण मन मात्र भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी आठवत बसल पण त्यातही चांगल्या नाही मनाला वाईट वाटणार्या अशाच गोष्टींचा विचार करत बसल. आत्ताच्या बोलण्यात काहीच मन दुखावेल असं नव्हतं पण तुझ्या आवाजातील चढपणाने जुन्या मनाला लागलेल्या गोष्टी उफाउळून बाहेर आल्या आणी तू कसा वाईट आहेस हे पटवून देऊ लागल्या. जेव्हा समोरच्या व्यक्ती बरोबर स्पष्ट मनातील बोलू शकत नाही तेव्हा आपलं मनच आपल्याशी बोलू लागत. पण त्या मनाचाही मूड असतो त्याचा मूड चांगला असला तर ते मन पॉझिटिव्ह विचार सांगू बोलू लागत आणि त्याच मनाचा मूड खराब असेल तर ते निगेटिव्ह विचाराने भंडावून सोडतं. शेवटी तुझा काहीच उपयोग नाही कशासाठी जगतोस कोण आणि कुणासाठी मरतोस अशा द्वीधा अवस्थेत टाकून स्वतःचा कोंडमारा करून सोडत. असे हे मन एवढ चंचल विचित्र का असत…….

मन हे दिसत नाही समोरच्याला जाणवतही नाही आणि कळतही नाही अशी ही अद्भुत गोष्ट सर्वांकडे असते तरीही ती मनाची अवस्था कोणी कुणाची समजूनच घेत नाही. समोरच्या व्यक्तिच्या मनात कोणता विचार सुरू आहे हे कोणालाच कळू शकत नाही.मनाला खुश करायला खूप कष्ट करावे लागते पण तेच मन क्षणाचा ही विलंब न करता दुःखी मात्र होऊ शकत. मनाला कितीही समजावा त्याची इच्छा नसेल तर ते एखादी गोष्ट कितीही पटवून देण्याचा प्रयत्न कराल पण ते ऐकतच नाही पण; एखाद्याचं मन हे हळवं, नाजूक, निरागस, निस्वार्थी ही असू शकत त्या मनाला काहीही आणि कोणतीही गोष्ट सांगा मग ती बरोबर असो वा चुकीची ते पटकन समोरच्यावर विश्वास ठेवून ऐकत.पण; अशा लोकांचा लोक खूप गैरफायदा घेतात म्हणून मनानं प्रत्येकानं दगडासारख कणखर तर मेना सारखं कोमल ही बनता आलं पाहिजे.

मनाला नाण्यासारख्या दोन बाजू ह्या असायलाच पाहिजेत कारण कधी जिंकता तर कधी हारता ही आल पाहिजे. पण ती हार पचवण्याची ताखद त्या मनात निर्माण करता आली पाहिजे. एक सांगू ; कधी कधी आपण एवढा विचार करतो आपण स्वतःच आपल्या मनाशी भांडत असतो कमी लेखत असतो तुला काही जमणार नाही तू एकटाच आहेस आणि तसाच राहणार तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही असं काही भलतच मन स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत असलं की समजावं आपण आपल्याच मनाचे दरवाजे बंद केले पाहिजेत. त्याला तिथेच थांबवलं पाहिजे आपली मानसिक स्थिती बिघडण्या अगोदर हे विचार चक्र तिथेच थांबवून ठेवलं पाहिजे, आणि ते करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला दुसऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतवा किंवा जुन्या मित्र-मैत्रिणींना फोन करा त्यांना आपल्या वर्तमानात भेटायला जा किंवा दूर कुठेही तरी एकांतात फिरायला जा ,मनसोक्त शाॅपिंग करा मंदीरात जा तिथे शांत बसून ध्यान करा तूम्हाला जी गोष्ट कराविशी वाटते ना ती तूम्ही करा पण दुसऱ्या एखाद्या गोष्टीत त्या चंचल मनाला गुंतवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही स्वतः तुमच्या मनाने शिकवू पाहिलेल्या निगेटिव्ह थॉट्समुळे डिप्रेशनमध्ये जाण्यास रोकु शकता. त्याला एकच सांगा मी अजून जिवंत आहे मी ठरवलं ना तर काहीही करू शकतो कुणालाही माहीत नसलेला मी संपूर्ण जगाला माझी ओळख होईल असं काहीतरी करू शकतो फक्त तुझ्यात गुंतला मी आजपासून सोडून दिल आहे आणि कारण तूच मला दुःखी करून सर्वांपासून लांब करत आहेस.

अरे हे मना मी नाही तुझा गुलाम

अरे हे मना तू आहेस किती हराम

तुझ्या निष्फळ प्रयत्नाला माझा सलाम

नाही अडकणार आता तुझ्या मी जाळ्यात

कारण रस्ता मला सापडलेला आहे तुझ्याच कोड्यात

शंका दुःख यातना आणि बेचेनच भरलीस तू माझ्या मनात

स्वतःचं अस्तित्व कधीच दाखवलं नाहीस तू मला माझ्या डोळ्यात

नेहमी निगेटिव्हिटीची कट्यार मात्र घुसवली माझ्या काळजात

पण आता नाही गुंतणार पुन्हा मी तुझ्यात

कारण माझा फक्त वर्तमान मी ठेवणार आहे माझ्या खिशात

तुझ्याशी बोलता बोलता कधी मी माझा रस्ता भरकटते हेच मला नाही समजत आणि किती आणि कुठे माझं चुकतं तेच नाही मला उमजत

माझी प्रगती होऊ शकते तुझ्याशी बोलण टाळण्यात

खरच गफलत झाली मला तूला समजण्यात

जर तुला कधी बोलावसं वाटलं तर तू मला ईनकरेंज करू शकतोस मला मोटिवेट करू शकतोस पॉझिटिव्ह बनवू शकतोस कारण कितीही केलं तर मी तुला माझ्यापासून वेगळं नाही करू शकत कारण आपण आहोतच एका नाण्याच्या दोन बाजू तू माझ्याशिवाय आणि मी तुझ्याशिवाय सांग बरं कसं जगू

जिथे होईल माझी निराशा तिथे नवीन आशा तू बनशील ना

जेव्हा मन माझे खचून जाईल तेव्हा धीर तू मला मला देशील ना

खूप उंच भरारी घ्यायची आहे मला हिम्मत तू देशील ना

ज्या लोकांना आपण काहीच करू शकणार नाही सतत निगेटिव्ह विचार येत असतील मनात तर फक्त एकदा मनापासून विचार करा आपण किती योग्य गोष्टींचा विचार करतो की किती अयोग्य गोष्टींचा विचार करतो म्हनूणच सांगावस वाटत अपयश आलं म्हणून लढन सोडून द्यायचं नाही पुन्हा प्रयत्न करायचा आणि यश खेचून आणायच. नात्या- नात्यांमध्ये छोटी-मोठी भांडणे होतच असतात पण कधीच आपण आपल्या माणसावरती राग धरायचा नाही आयुष्य एकदाच मिळते मनसोक्त जगायचं प्रत्येक क्षणाक्षणात आनंदी राहायचं. पैसा, सोन, बँक बॅलन्स, ईस्टेट प्रत्येक जण साठवण्याचा प्रयत्न करत असतो पण जिवाला जीव देणारे माणसं आपुलकीने वागणारी माणसं आयुष्यात असावी असं ठराविक लोकांना वाटतं कारण शेवटच्या क्षणी हीच माणसं आपल्या जवळ असतात कारण जन्माला आलेला कधी ना कधी जात असतो आणि जाताना कधीच आणि कोणीच काही घेऊन जात नसतं पण जाताना ह्याच आपल्या माणसांच्या हृदयात स्वतःच अस्तित्व ठेवून जायच असेल तर इतरांशी प्रेमाने आपुलकीने वागा स्वार्थ अहंकार बाजूला ठेवून जगा. Post आवडल्यास नक्की like करा. ✍ सौ. शितल कृष्णा पाटील

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star