सुखाच्या शोधात किती फिरशील वनवन
स्वार्थासाठी बैचेन करून टाकलेस तूच तूझे जीवन
पैशासाठी झालास माणसापासून दूर
स्वार्थी वृत्ती तुझी किती रे फार
स्वतःहून बंद करतोस तू सुखाचे दार
आयुष्यभर राहील तुझ्यावर प्रेम माया उदार
तुटेल तुझ्या श्वासाचा दोर
तेव्हाच संपेल तुझ्या जीवाचा घोर
जेव्हा होईल तुझे मन शांत
तेव्हाच तुला लागेल झोप निवांत
गोड शब्दा शब्दातूनच निर्माण कर तू जिव्हाळ्याची रेती
आणि हो तू निस्वार्थापुढे नतमस्तकी
तेव्हाच होईल तुझे जीवन खरे सार्थकी