
मिळेल का मला पुन्हा एकदा माझा बालपण
होऊन गेलेले ते अविस्मरणीय गोड क्षण😊
ना कसली भीती ना कसलं टेन्शन फक्त मनाला वाटेल तसं जगणं
मनसोक्त रानावनात फिरणं आंबे पेरू चिंचा अगदी झाडावर चढून खान
उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेनेवाट पाहणं बाराचा ठोका झाल्यास विहिरीला पोहायला जाण, घरी येता येता ओल चिंब होवून करवंदीच्या झाडावर चडून मनसोक्त करवंद खान
सर्वांन बरोबर केलेली ती मज्जा काही निराळीच होती, मस्ती केल्यावर मिळालेली शिक्षा वेगळीच होती

आंब्याच्या झाडाला बांधलेला तो झोका आणी नंबर साठी लागलेली भांडन, भर उन्हात घामाघूम होईपर्यंत सायकल चालवन आणि कुठेतरी खड्याचा अंदाज चूकता सायकल वरून पडून गुडगे फोडून घेन अन असेल तेवडी ताकद लावून रडून रडून घर डोक्यावर घेन
काय ते दिवस होते आणि काय त्या आठवणी
छोट्या -छोट्या गोष्ठीत खूप आनंद होता
दुःख काय असत याचा लवलेश ही आयुष्यात नव्हता
अस हे स्वछंद आयुष्य पुन्हा एखदा जगता येईल का
बालपनाचा फक्त एखदा Flashback होईल का?

You must be logged in to post a comment.