माहेर आणि सासर असत फक्त मुलींना
त्यांच्या मुळेच दोन कुटुंब जवळ येतात
लग्ना आधी त्या राजकुमारी असतात
आणि लग्ना नंतर सासरच्या राणी सरकार होतात
अस काही नसत, फक्त बोलन्या पुरत असत
लग्ना आधी एका चाॅकलेट साठी बहिन – भावा बरोबर भांडन असत
आणि लग्ना नंतर तेच चाॅकलेट एकटी कस खाऊ असा विचार करता करता त्या चाॅकलेट वरती मुंग्याच वारूळ बनत
लग्ना आधी असतात मुली बिनधास्त मनाला वाट्टेल तस जीन
लग्ना नंतर सांभाळाव्या लागतात चाली, रीती आणि सारी बंधन
पण मुलीच असतात दोन कुटुंबातील खर सोन
कारण त्यांच्या सहवासान सारी नाती चमकत असतात
मुलगी आणि सुने मुळेच घराला घरपण असत, कारण तिच्या सहवासान घरातील वातावरण प्रफुल्लित होत
स्त्री च प्रत्येक पुरुषाचा आधार असते
आई ,बहिन,बायको सारी नाती ती अगदी मनापासून जपते
एवढी सहन शक्ति फक्त स्त्री मधेच असू शकते म्हणूनच
स्त्री म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप असते.