जेसी करनी वैसी भरनी

आपण फक्त इतरांकडून अपेक्षा करत असतो पण आपण त्या अपेक्षेस पात्र आहे की नाही हे पहिल्यांदा पडताळून पहा कारण आपण समोरच्या व्यक्तीला किती मान देतो तिचा किती आदर करतो तिला किती व्हॅल्यू देतो त्याच्यावरूनच समोरची व्यक्ती आपल्याला जज करत असते. कारण आपण इतरांना नेहमी कमी लेखत असून स्वतःच किती शहाणे आहोत आणि आपलंच सगळं कस खरं असं वागत असू तर त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नेहमीच राग तिरस्कार हा निर्माण होणार कारण समोरची व्यक्ती कितीही तोंडावरती गोड गोड बोलत असली तरी तिच्या मनात आपल्याविषयी राग तिरस्कार हा असतोच कारण तिला एक गोष्ट नक्कीच माहित असते; आपण त्या व्यक्तिला त्याच्याच भ्रमात राहू दिल तरच आपला फायदा आहे आणि वैर केल तर तोटा .काही व्यक्ति खूप भोळ्या असतात त्यांना समोरचा कोणत्या हेतून बोलत आहे हे समजतच नाही त्याच्या प्रत्येक गोष्ठीवर विश्वास ठेवतात आणि स्वताच नुकसान करून घेतात.

फसवनार्याने एक लक्षात ठेवाव कधिना कधी आपल सत्य बाहेर पडनारच. कारण परमेश्वरचा न्याय सर्वाना समान असतो फक्त तो न्याय योग्य वेळेवर ठरलेला असतो.गाडी बंगला, नोकर ,चाकर सार ऐश्वर्य असनारा सुखी असेलच अस नाही पण बघनार्याला अस वाटत किती सुखी आहे हा त्याला कश्याची कमी नाही. हे प्रत्येकाला बाहेरून असलेल सुख दिसत पण त्या व्यक्तिच्या मनाला ते सुख लाभत का?नाही कारण सर्व काही आहे पण ते सुख भोगायला पदरी मुल असायला हव ना ,सुख दुःखात साथ देणारी आपुलकीची मानस हवीत ना मग काय उपयोग या संपत्तिचा ; मानसाला जगायला फक्त दोन वेळच जेवन बस होत पण ;तेच दोन घास वाटून खाण्यास आपली हक्काची मानस हवीत ना…काही गोष्टी अशा असतात की त्या पैशाने विकत घेता येत नाहीत त्यातली एक म्हणजे सुखाची झोप कितीही पैसा असला तर तरीही सुखाची झोप विकत घेता येत नाही दुसरी म्हणजे मनाच समाधान कितीही पैसे कमवा प्रत्येक चैनीची वस्तू विकत घ्या पण त्या लालची मनाचा हव्यास हा वाढतच जातो त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही कारण त्याचं मन समाधानी नसतं कितीही मिळालं तर अजून वेगळं काही हवच असतं म्हणून आहे त्यात समाधान मानायला शिका आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी जाणार असतो. येताना ही तो रिकामाच येतो आणि जातानाही तो रिकामाच जातो मग दुसऱ्याचं सुख ओरबडून घेण्यात कसली मजा; आनंद वाटल्याने आनंद द्विगुणीत होतो आणि दुःख वाटून घेतल्याने दुसऱ्याचं दुःख कमी होतं ही साधी सोपी गोष्ट अजून लोकांच्या लक्षातही येत नाहीये प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करतो स्वतःला काय हवंय काय नको फक्त याचाच विचार करत असतो पण कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघा कारण जर तुमच्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आला तर ते पाहून तुमच्या मनाला मिळालेले समाधान काही वेगळंच असतं आणि हे समाधान कुठल्या ही दुकानात विकत मिळत नसतं ते ह्दयातून अनुभवाव लागत.ज्याच्या त्याच्या कर्माच फळ त्याला याच जन्मात मिळत असत. म्हणून नेहमी चांगल कर्म करा…

गरिबाकडे पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती खूप असते.तो समाधानी असतो कारण दोन वेळच जेवन आणि सुखाची झोप त्याला मिळते तो स्वताच्या कष्टातून मिळालेल्या घासातील घास वाटून खात असतो. कधीही आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांकडे बघून आपण स्वतःला कमी लेखू नये कारण नेहमी आपल्यापेक्षा गरीब लोकांकडे बघावं पहावं त्यांच्यापेक्षा आपली परिस्थिती कितीतरी पटीने चांगली आहे आणि त्यातच आपण समाधान मानाव कारण; माणूस हा असा प्राणी आहे त्याच्या मनाच समाधान कधीच होत नाही कितीही मिळालं तरी त्याला अजून हवंच असतं म्हणून आहे त्यात सुख मानून जगावं.

गैर मार्गातून आलेल्या पैशाचा नाश अटळ असतो फक्त योग्य वेळ यावी लागते म्हणून जे काही कमवाल ते स्वतःच्या कष्टाने कमवा कोणत्याही कामाला कमी लेखू नका कारण काम हे काम असतं ते छोटं किंवा मोठं नसतं फक्त करणाऱ्याच्या इच्छेचा भाग असतो लोक ही नाव ठेवण्यासाठीच निंदा करण्यासाठीच असतात पण जेव्हा तुमची प्रगती होईल तेव्हा हीच निंदा करणारे लोक तुमच्या अवतीभवती घुटमळत राहतील…….

✍ सौ. शितल पाटील

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star