आजी तुझ्या विना करमत नाही
आले माहेरी पण तू कुठे दिसतच नाहीस…
आठ दिवस झाले येवूनी मला पण एकही दिवस मला शांत झोप नाही
कारण कुशीत तूझ्या मला तू घेतलच नाहीस
चार भिंतीच्या घराला तूझ्या वीना घरपण नाही
तुझ्या आठवणीशीवाय माझी दिवस आणि रात्र संपतच नाही
आजी का सोडून गेलीस मला तू……,आजी हवी होतीस ग आम्हाला तू, शेवटचा निरोप घेताना सर्वजन तूझ्या जवळ होते पण मला न भेटता का निघून गेलीस
जीवाच्या आकांतान मी तूला विनवत होते फक्त एखदा माझ्याकडे डोळे उघडून पाहिच होतस, तूझ्या लाडक्या नातीला एखदा कुशीत घ्यायच होतस
माहेर जाव म्हणून मला सारखे संकेत मिळत होते
पण तूझ्या जवळ जास्त दिवस रहायला मिळाव म्हणून मी निवांत यायच ठरवल होत
मला कधीच वाटल नव्हत तू अशी अचानक निघून जाशील
आणि निष्ठुर काळ आपली कायमची ताटातूट करेल
आजी तूझ्या प्रत्येक आठवणी माहेर च्या अंगनी रेंगाळतायत,
तू आमच्यात नसूनही असन्याची जाणीव करून देतायत
तू नेहमी आमच्या हद्यात असशील फक्त खंत एवढीच
तूझा मायेचा स्पर्श कधी भेटणार नाही
देवाकडे फक्त एकच मागन माझी आजी जिथे कूठे असेल तिथे तिला सुखात ठेव,
कारण या स्वार्थी जगात तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे
कूणाच्याही आधाराविना 100 वर्षाचा वनवास भोगावा लागला आहे.
Miss you much Aaji😓
✍सौ. शितल पाटील