ओड गावाकडची

वेळ कुणासाठी थांबत नसते भविष्यात येणारी वेळ आपल्या हातात असते परंतु निघून गेलेली वेळ ती पुन्हा कधीच येत नसते ते क्षण पुन्हा कधीच आपण जगू शकत नाही म्हणून आहे त्यात आनंदी राहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक सजीव जगतच असतो पण ; माणूस हा असा एकच प्राणी आहे, जो फक्त आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. आपल्याला हवं तसं जगू शकतो आनंदी राहू शकतो मग आपण देवानं दिलेली एवढ्या सुंदर देणगीचा वापर का बरं नाही करायचा. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत असतो,मग ती गोष्ट घडून गेलेली असली तरीही त्याच टेन्शन, घडत आहे त्याचेही टेन्शन,आणि पुढे आपल्या मनासारखं घडेल की नाही याचाही टेन्शन घेतो. पण का कशासाठी ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या गोष्टीच टेन्शन घेऊन काय उपयोग उलट त्या गोष्टीचा आपल्यालाच त्रास होणार म्हणून जीवन अगदी आनंदी जगावं स्वतःला हवं तसं कारण गेलेली वेळ पुन्हा कधीच पाठीमागे येत नसते. मोठे झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण बालपण, तेव्हा वाटतं आपल्याला की लहान असतो तर किती बरं झालं असतं मोठ्यापणी खूप टेन्शन असतं अभ्यासाचा असो वा इतर गोष्टी, लहान मुलांचं जीवन म्हणजे स्वच्छंद पक्षाप्रमाणे स्वतःला वाटेल तसं कोणीही काही बोललं तर ते मनावर घ्यायचं नाही स्वतःला वाटेल तसं जगायचं. मनात असल तरी त्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत, इच्छा असली तरीही करत नाही आपण का ? तर समोरचा काय म्हणेल आपल्याला लहान मुलासारखा वागतोय. आपण त्याचाच नेहमी विचार करत असतो कोण काय म्हणेल आपल्याला, म्हणजे बोलणारी माणसं आपल्या तोंडावर बोलतात का? जर बोललीस तर त्यांना तुम्हाला उत्तर देऊ शकता येणार नाही का? का देता येता नाही तुमच आयुष्य तुम्ही स्वतःला हवं तसं जगू शकता.

मलाही दोन मुलं आहेत आम्ही शहरात राहत असल्यामुळे माझ्या मुलांना गावाकडील वातावरण खूप आवडतं. आजकाल शहरातील मुलांना गावाकडील गोष्टी जगता येत नाहीत गावाकडील खेळही त्यांना खेळता येत नाहीत चार भिंतीच्या आत खेळ असतात शहरातील मुलांचे, पण मी नेहमी जेव्हा कधी माहेरी येईल तेव्हा मुलांना ज्या गोष्टी मी माझ्या लहानपणी केल्या आहेत त्या सर्व गोष्टी त्यांना शिकवते बिनधास्त कसलीही भीती न बाळगता त्यांना लागेल पडेल कोण काय म्हणेल याचा काही विचार करत नाही झाडावर चडन असो वा पाण्यात पोहन असो. आहो आजकालच्या मुलांना भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात ते त्यांना माहित नाहीत पण शेंगदाणे मात्र खूप आवडतात. स्वीट कॉर्न, पाॅपकाॅर्न हे शब्द इंग्लिश मधले आहेत पण ते किती मुलांना आवडतात पण त्या स्वीट कॉर्नरला मराठीत मक्याचे कणीस म्हणतात आणि ते कणीस कुठे असतं हे कोणाला माहित आहे का नाही पॅकेट मधल्या खाऊ खाणाऱ्या मुलांना गावाकडचा रानमेवा खायला मिळत नाही. गावी आले की नेहमी मुलांना रानात घेऊन जाते वेगवेगळ्या पिकांची माहिती देते मी पिकांचा डीप मध्ये स्टडी केलेला नाही पण मी लहानपणापासून माझ्या आई- वडिलांकडून जे काही शिकत आले आहे जे काही माहित आहे ते मुलांना सांगते ते मुलांना आवडत. उसाचा रस पिनार्या मुलांना शेतातून ऊस काढून आणून तो सोलून खाण्यात जी मजा असते ती काचेच्या ग्लास मधून बर्फ टाकूनही पिला जाणाऱ्या रसामध्ये येत नाही. आंब्याच्या पेटीतील आंबा सुरीन कापून खान आणि रानात जाऊन झाडावर चढून किंवा दगडाचा नेम धरून आंबा पाडून आणि तो चोखून खाण्यात जी मजा असते ती मजा आंब्याच्या फोडी करून खाण्यात नसते. राना वनात भटकंती करून चिंचा ,पेरू,करवंद,जाभंळ,फणस,अशी फळे स्वःताच्या हातानी तोडून खान हा आणंद फक्त गावाकडच्या मुलांनाच भेटतो.

Air Conditioning car मधून फिरनार्या मुलांना मोकळ्या हवेतील ऊन्हाचा चटका सोसत नाही. म्हणून अश्या मुलांना वर्षातून एखादा महीना का होईना गावाकडील जीवनशैली दाखवन्यासाठी घेवून जाव. त्यांना बैलगाडी ची सैर दाखवायलाच हवी. तेव्हा समजेल आपली मुल प्रदुषित sity मध्ये किती नाजूक बनत चालली आहेत. माझा मोठा मुलगा 8 वर्षाचा आहे व छोटा मुलगा 4 वर्षाचा आहे.दोघांनाही गावी गेल्यावर पोहायला शिकवल आहे आणि तेही विहीरी मध्ये swimming pool मध्ये पोहायला शिकवल जात पण खरी भिती विहीरीत किंवा नदी मध्ये पोहायला शिकवल्यावरच जाते. उंचावरून पाण्यात उड़ी मारताना उड्यांनचे वेगवेगळे प्रकार शिकने काठावरून उडी मारून विहीरी मधला गाळ ( तळातील माती,दगड) काढणे आणि तो काढल्या नंतर मनाला मिळालेल समाधान काही निराळच असत. पावसाळयात जमिनीच्या उताराच्या दिशेने केलेली घसरगूंडी skating पेक्षा खूप छान असते. आकाशात जेव्हा ढग दाटून येतात,सप्तरंगी इंद्रधनुष दिसतो आणि थंडगार वारा सुटतो,अलगत पावसाचे टपोरे थेंब पडताच अंगावर येनारा शहारा तोच थेंब मातीत मिसळताच सुटलेला मातीचा सुगंध महागड्या perfumes पेक्षा खूप आल्हाददायक असतो. आणि त्याच वेळी झाडाच्या गर्दीतून मोराचा येनारा आवाज आणि अचानक पिसारा फुलवलेला मोर नजरेस पडन म्हणजे मनमोहक निसर्गाच्या प्रेमात पडलेली नशा काही ओरच असते. खरच हे अदभुत दृष्य cement concrete च्या मोठमोठ्या बिल्डिंग, टाॅवरर्स च्या जंगलात कधीच पाहता येणार नाही.

एक सांगू मूल लहान आहेत तोपर्यंत त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगून द्यावं कारण मोठेपणी कोणीच आपल्या मनाप्रमाणे जीवन जगू शकत नाही. त्याच्यावर वेगवेगळे नियम, अटी, संस्कार किंवा बंधन त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देत नाहीत. पण; जेव्हा तीच मुलं चुकतील तेव्हा त्यांना शिक्षा ही जरूर करावी कारण त्यांना त्यांची चुक समजली नाही तर ती चूक पुढील आयुष्यात अपराध बनू शकते. मुलांवर संस्कार हे लहानपणीच करावे लागतात कारण तेच संस्कार तुम्ही मोठ्यापणी मुलांना शिकवू लागलात तर ते त्यांना बंधने वाटू लागतात व मुले जास्तच चुकीच्या मार्गाला जातात आत्ताची मुले आपल्यापेक्षा चार पावले पुढेच आहेत . खूप हट्टी झाली आहेत, त्यांना नॅचरल पेक्षा आर्टिफिशियल जास्त आवडू लागलं आहे. हेल्दी फूड खाण्यापेक्षा अनहेल्दी आणि स्पायसी फूड आवडू लागलं आहे. त्यामध्ये त्यांची काहीच चूक नाही, चुकतो तर आपण त्यांना कुठे माहीत होतं फुडची टेस्ट आपणच त्यांना चाखायला दिली ना आणि आता त्यांना तेच आवडू लागला आहे दोष आपण स्वतःला न देता मुलांना देत असतो. पुरातन काळापासून मुलं गर्भात असल्यापासून गर्भावर संस्कार केले जातात पण आत्ताच्या युगातील स्त्रिया काय करतात रामायण, महाभारत, भगवत गीता वाचण्यापेक्षा मोबाईल वरती व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब यासारख्या साईट्सवर आपला वेळ घालवत असतात, मग कसले संस्कार होणार त्या मुलांच्या मनावर ते गर्भात असल्यापासूनच मोबाईल ऑपरेट करायला शिकत असतात, मग बाहेर आल्यानंतर त्यांना मोबाईल मधल समजतं यावरून आपण त्याचं कौतुक करत असतो पण त्यांना त्याच मोबाईलची सवय लागली की ती सोडवण्यासाठी खूप त्रास जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं पण ;आपण कुठे चुकतो हे आपल्या लक्षात का येत नाही, दुसऱ्याला ज्ञान शिकवायला जातो आणी आपण अज्ञानात राहतो. मुलांना चार भिंतीच्या आत कोंडून ठेवण्यापेक्षा त्यांना खुल्या वातावरणात खेळू देत बागडू देत चिखल ,माती, दगड धोंडे यांच्या समवेत राहू दे जेवढी जास्त काळजी तुम्ही मुलांची घ्याल तेवढी जास्तच मुलं नाजूक होत जाणार. सतत हँडवॉश डेटॉल विविध केमिकलचा वापर करून तुम्ही घर निर्जंतुक करूनही मुलं सतत आजारी पडत असतात. मुलांची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर त्यांना घरातून बाहेर काढा मोकळ्या हवेत फिरायला न्या किती काळजी कराल तुम्ही मुलांची, अरे ऊसतोड कामगार यांची मुलं तर त्याच उसाच्या शेतात झोपलेली असतात खेळत असतात त्यांना का बरं इन्फेक्शन होत नाही, का रस्त्यावर काम करणारी लोकांची मुलं त्याच रस्त्याच्या कडेला भर उन्हात मातीत खेळत असतात त्यांची मुलं का बरं आजारी पडत नाहीत कारण त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच सर्व गोष्टींची सवय असते पॅकेट बंद खाण खाण्यापेक्षा घरात केलेला डाळभातातही मुलांना ताकद मिळू शकते.

भविष्यात मुलांच जीवन सुखी ठेवायच असेल तर City मध्ये Flat घेण्यापेक्षा गावाकडे एक गुंटा का होईना पण Plot विकत घ्या.कारण गरज आहे शुद्ध हवेची निर्सगाची आणि नैसर्गिक वातावरनाची.

आवडल तर नक्की like आणि comments करा

✍ सौ. शितल कृष्णा पाटील

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star