
कधी-कधी शब्दच अपुरे पडतात तुझ्याशी बोलताना
कधी-कधी अर्थतच निराळे निघतात मनात काही नसताना
शब्दा शब्दातून नाती घट्ट होत जातात पण, त्याच शब्दांचा चुकीचा अर्थ लावताच त्याच नात्याला तडे जाऊ लागतात
एकमेकांना जवळ आणणारे हे शब्दच असतात पण, तेच शब्द दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात
मनातील भावना शुद्ध असताना का या शब्दांच्या अधीन व्हायचं
न बोलताही आपण एकमेकांच्या हृदयातील ओळखायचं
कशासाठी हवा हा शब्दांचा दुवा
फक्त नजरेने नजरेस बोलून टाकाव्यात मनातील भावना
मग का बर होतील वाद-विवाद आणि गैरसमज
कारण त्या शब्दांनाही एवढी नसणार उमज
शब्दातून होणारे वाद कसे टाळले जातील कारण सगळे प्रश्न फक्त नजरेनेच सुटतील
असे हे शब्द कधीकधी न वापरता जगता आलं पाहिजे मनातील भाव समोरच्याला फक्त एका नजरेने सांगता आले पाहिजे
न बोलता ही बोलता आलं पाहिजे हृदयातील भाव फक्त नजरेने समोरच्या पुढे मांडता आलं पाहिजे
असा हा शब्दांचा खेळ एकदा खेळून तरी बघा, त्यांनाही थोडा आराम देऊन मनासारखं थोडं जगून तरी बघा.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील
You must be logged in to post a comment.