रात्रीच्या मीनमीन त्या प्रकाशात
चंद्राची कोर दिसते आकाशात
सहज तुझी आठवन झाली
लांब असूनही जवळ असल्याची जाणीव करून गेली
वर्तमानात जगता जगता नकळत भूतकाळात घेऊन गेली
खरच मी खूप सूखी आणि समाधानी आहे
कारण तू माझ्या आयुष्यात आहेस
फक्त शेवट पर्यंत अशीच तूझी साथ मिळावी
तूझ्या प्रत्येक पावलावरती माझी सावली असावी
ठेच तुला लागताच वेदना मला झाल्यावर समजल
प्रेम म्हणजे नक्की काय असत हे तूझ्यावर केल्यावर उमजल.