समोरच्या व्यक्तिला कधिही ग्रृहित धरू नका
तिला ही मन असते फक्त एखदा विचारून तरी बघा
काही लोक असेही असतात की त्यांना व्यक्त होता येत नाही
त्यांच्या मनातील अबोल तार प्रेमाने छेडून तरी बघा
गूदमरलेल्या भावनांचा रस्ता मोकळा होईल
आणि त्या व्यक्तिच दाटलेल मन हलक करण्याच पुण्य तूमच्या पदरात पडेल
असतात असे लोक ज्यांना मन मोकळ करून बोलता येत नाही
मनात असंख्य शंका, प्रश्न असतात पण ओठावरती मात्र येत नाहीत
स्वःताची नवीन दुनिया बनवतात पण सोबतीला कुणाला घेत नाहीत
म्हणून त्या लोकांना हवा असतो फक्त विश्वासू आधाराच्या शब्दांचा सहारा
तेव्हा त्यांनाही लाभेल मन मोकळ झाल्यास समाधानाचा किनारा.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील
हो अगदी खरे आहे. आपल्या आयुष्यात सदैव एक मित्र तरी असायला हवा किंवा एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे काहीही बोलण्यासाठी कशाचाच विचार करण्याची गरज भासली नाही पाहिजे. एकदम मनमोकळेपणाने बोलावं आणि त्याने सुद्धा ते ऐकायला हवं… 🤗🤗🥳🥳🥳🤩🤝🤜🤛
LikeLiked by 1 person