

कधी कधी असेही जगता आलं पाहिजे
स्वतःला विसरून मुक्त होऊन हवेत तरंगता आलं पाहिजे
कधी कधी ……………….पाहिजे
डोळे बंद करून स्वतःचं प्रतिबिंब रेखाटता आल पाहिजे
समुद्राच्या अवाढव्य लाटांवरून चालता आलं पाहिजे
हवेच्या प्रत्येक झोक्या बरोबर स्वतःला सावरता आलं पाहिजे
कधी कधी असंही जगता आलं पाहिजे ……
पाय जमिनीवर ठेवून आकाशाला गवसणी घालता आली पाहिजे
अपयशाची सीमा पार करून यशाच्या शिखरावरती दिमाखाना बसता आलं पाहिजे
कधी-कधी असेही जगता आलं पाहिजे
सुख दुःखाला खूटीला टांगून आयुष्याचा आस्वाद घेता आला पाहिजे
कधी कधी आयुष्याच्या प्रवासात नसेल कुणाची साथ तर स्वतःचा सोबती बनून राहता आलं पाहिजे
कधी कधी असेही जगता आल पाहिजे
इच्छा ,आकांक्षा अपेक्षा यांच्या दबावा खाली न राहता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे
कधीकधी असे जगतात आलं पाहिजे
स्वतःला सिद्ध करताना लाखो अडचणी येतील पण त्या अडचणींना स्वतःच्या ध्यास प्राप्तीच्या जिद्दीने हरवता आलं पाहिजे
कधी कधी असेही जगता आलं पाहिजे
कधी कधी असं हे जगता आलं पाहिजे
✍ सौ.शितल कृष्णा पाटील
Mast
LikeLiked by 1 person
Reblogged this on मराठी कविता आणि लेख.
LikeLiked by 1 person