का कळत नाही तुला अजूनही माझ्या मनातलं
का समजून घ्यायचं नसतं तुला माझ्या हृदयात
अपेक्षा काही जास्त नाहीत माझ्या तुझ्याकडून
सर्वच चुका होतात का माझ्याकडून
मी मान्य करते, मी चुकत असेल
मनातलं बोलताना घाबरतही असेल
पण खरंच सांगते मी ऐवढी स्वार्थी नाही रे
फक्त तु सोबत असावस अस मनाला वाटत रे
माझ्या निस्वार्थी भावनेला तू नेहमीच वेगळा अर्थ लावलास
माझ्या अबोल स्वभावाला तो नेहमीच गृहीत धरून चाललास
मला तू नवरा बनून नाही तर खरा मित्र बनून हवा होतास माझ्या आयुष्यात
मनातल न सांगताच ओळखायला हव होतस तू माझ्या डोळ्यात
प्रत्येक गोष्ट पैशांनी विकत घेता येते पण मनाचं काय?
ज्या ज्या वेळेस मला खरंच तुझी जास्त गरज होती तेव्हा तू माझ्याजवळ नव्हतास
नोकरीच कारण सांगून तो नेहमी विषय बंद केलास
अरे मीही समजू शकते तूझा जॉबच तसा आहे
नाही वेळ देऊ शकणार मला पण;
बायको आहे मी तुझी तुझ्या जवळ नाहीतर हट्ट कोणाजवळ करणार
इतर स्त्रियांसारखं मला ही वाटत होतं मीही तुझ्यासोबत राहावं
पण तू लग्नानंतर आई- वडिलांसाठी
लांब ठेवलस, तर नंतर मुलांच्या शिक्षणाच कारण पुढे केलस
पण ; आता माझं ठरलंय ज्या दिवशी तुला गरज वाटेल माझी तेव्हा तुला मी माझ्या मनातल्या दबलेल्या गूदमरलेल्या रात्रींचा काळोख तुझ्यासमोर मांडणार
तू नसताना माणसांच्या गर्दीतला एकांत हा तुला दाखवणार
दहा वर्षाच्या प्रवासात खूप सुख दुःख बघितली
काही संकटे अशीही होती ती जीवावरून बेतली
पण आपण कधीच हार नाही मानली
तुझ्या माझ्या संसारात देवानं अगदी भरभरून सगळं काही दिलं
पण ;
तरीही खंत एवढीच एवढ्या वर्षात तुला माझ्याशी मन मोकळं करून बोलताना नाही पाहिलं
कदाचित तुझा स्वभावच असेल असा अस मी मानलं
तुझ्या आयुष्यातील खास हक्काची व्यक्ती मीच आहे का अस एखाद्य प्रश्नचिन्ह माझ्यापूढ उभ राहील
पण तरिही काहीही असो तरीही माझ पहिल आणि शेवटच प्रेम मी फक्त तूझ्यावरच केल.
खूपच छान आहेत , तुमच्या मनातील खंत ( मनस्ताप ) .
जीवन खूप छान ते फक्त आपल्या साथीदाराच्या सहवासात राहिल्याने रंगीत होत हे मात्र खरं आहे.
LikeLiked by 2 people
Thank you 🙏
LikeLiked by 1 person