मनातल समोरच्याला सांगता आल पाहिजे
व्यक्त नाही होता आल, तर ते शब्दात मांडता आल पाहिजे
शब्द जूळावेत म्हणून मी नाही लिहील
प्रत्येक ओळीत माझ्या मनातल तूला न उलघडलेल्या कोड्याच उत्तर मी दिल
तूला पडलेल्या शंकाच निरसन केल
तूझ्या मनावरच न दिसनार ओझ कमी केल
माझा तूझ्यावर पूर्ण विश्वास आहे…..
फक्त तू माझ्याशी बोलत जा, माझ्यासाठी तूला वेळ मिळेल तसा तू देत जा
मला काही जास्त अपेक्षा नाही तूझ्या कडून
छोट्या छोट्या गोष्टीतही मला आनंद मिळतो
फक्त तू मला समजून तरी घ्यायचा प्रयत्न कर
शब्दात मांडता नाही आल तरी चालेल पण तूझ्या मनातल तूला हव तस मला सांगायच तर ठरव
तूझ्या स्वभावाची मी माझी वेगळी दुनिया निर्माण केली
तू काही न बोलताही सर्व काही बोलत असतोस
मूड माझा चांगला असला कि तू चांगला असतोस नाहीतर तू मतलबी निघतोस
कदाचित हे माझ्या मनाचेच खेळ असतील
तूला पटनारही नाही प्रत्येक खेळाला दिलेले रंग माझेच दिसतील
आज तूझ्याशी बोलताना मनातल सार काही सांगून टाकल
दहा वर्षांनी का होईना पुन्हा एखदा नव्यान तूला समजून घेण्याच समाधान भेटल
तू मला नेहमीच सावरून घेतलस आणी आजही तू तेच केलस
चूक माझी असताना माफी तू माघून आपल्या नात्याला नवीन आयुष्य दिलस.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील