
गोड गोड बोलून काम करून घेणारी लोक अशीच असतात
काही जवळची असतात तर काही दूर असूनही सहज भेटतात
पण मतलबासाठी गोड बोलणारी लोक दुसऱ्याला फसवता- फसवता स्वतःच एकदा फसतात
काही लोक अशी असतात तोंडावर गोड बोलणारी आणि पाठीमागे निंदा करणारी
पण कोण जाणे अशा लोकांच्याच मागे लोक का फिरतात
एक दिवस असाही येतो ते जाणून बुजून त्यांच्या गोड बोलण्याला खर मानतात
मग पश्चातापाशिवाय शेवटी पर्याय कुठे उरतात
म्हणूनच…
माणसाने माणसाच्या गोड बोलण्यावर अंधविश्वास ठेवू नये कारण लोक एकना एक दिवस तुमच्या चांगूलपणाचा फायदा उठवतात
शेवटी तुम्हाला भ्रमात ठेवून तुमच्या विश्वासाला खंजीर खूपसतात
तुमच्या भावनांचे झालेले तुकडे अशा प्रकारे विखुरतात की ते कुणाला दिसतही नाहीत आणि जाणवतही नाहीत
पण ;
तुमच्या मनावर झालेले आघात तुम्हाला सोसवतही नाहीत
अशीही गोड गोड बोलणारी माणसं तुमच्या आमच्या भोवती असतात
ते दिसायला वेगळी काहीच नसतात पण तरीही त्यांच्या गोड बोलण्यास तुमच्या आमच्यासारखे लोक सहज फसतात.
You must be logged in to post a comment.