संकेत संकटाच

16 सप्टेंबर 2020 हा दिवस आठवला की अंगावर काटाच येतो कारण आम्ही सर्वजण म्हणजेच आमची जॉईन फॅमिली आहे सासू- सासरे आम्ही दोघे आमची दोन मुले दिर जाऊ आणि त्यांचा मुलगा असा आमच नऊ माणसांचं कुटुंब आहे. आम्ही कोल्हापूर मध्ये राहत असलो तरी आमचं मूळ गाव मांगरूळ आहे. 2020 मध्ये कोरोना या व्हायरसने सर्वच लोकांचे जीवनमान बदलून टाकलं होतं. सर्वत्र भीतीच वातावरण झालं होतं. प्रत्येक जण आपल्या जीवाला घाबरू लागला होता, नाती-गोती मित्र मंडळ तसं म्हणायला गेलं तर आपल्याला जन्म दिलेल्या आई-वडिलांचाही विसर पाडून प्रत्येक जण आपल्या जीवाची काळजी करत होता. कुठून हा व्हायरस आला आणि अचानक हसत्या खेळत्या आयुष्याची घडीच विस्कटली.

आमचा मांगरूळ चा वाडा

मांगरूळला आमचा खूप छान वाडा आहे,अगदी फिल्म मध्ये दाखवतात तसा म्हणायला हरकत नाही आणि तिथे आमच खर गोकूळ आहे. माझे सासरे धरून चार भाऊ आहेत त्यांची मुलं 13 म्हणजे आम्ही जावा- जावा तेरा जणी व आमची मुलं धरून एकूण 53 लोकांच आमच कुटुंब आहे. पण आता नोकरीमुळे त्यातील बरेच लोक बाहेर पडले आहेत पण तरीही मोठा सण असो वा कार्यक्रम असो प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमात आमचं 53 लोकांचं कुटुंब एकत्र असत. पण त्या दिवशी कोणताही कार्यक्रमही नव्हता आणि कोणताही सण नव्हता आम्ही सर्वजण एकत्र येण्याचं कारण आमच्या दोन नंबरच्या सासूबाई काकू यांना घरातील प्रत्येक व्यक्ति या नावाने बोलवत असत आणि आधीच्या दिवशी त्यांचं कोरोना झाल्यामुळे निधन झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन असल्यामुळे आम्ही सर्वजण मांगरूळला जायला निघालो होतो.सकाळी लवकर उठून सर्व आवरा आवर केली कपडे आदल्या दिवशीच भरून ठेवली दोन लहान मुलं असल्यामुळे तिथे कसली गैरसोय नको म्हणून, मुलांना खायला घातलं सर्व आवरून गाडीत बसलो त्यात या महाभयान कोरोनाच्या आजारामुळे मनात खूप भीती होती. अस आई ना पण बोलले आपली तीन मुलं लहान आहेत तुम्ही आण्णा म्हणजे आमच्या सासरे पण वयस्कर आहात उगीच रिस्क का घ्यायची जीवाची पण; त्या बोलल्या सगळं बरोबर आहे पण आपल्या घरातील एखादी व्यक्ति आपल्याला सोडून गेली असेल तर आपल्याला जायला तर पाहिजे, कारण माती आड गेलेली व्यक्ति पून्हा कधीच भेटत नसते.मी गप्प झाले सर्वजण आवरून गाडीत बसलो आणि निघालो गाडीही व्यवस्थित सुरू झाली पण शिवाजी पुतळ्या समोर अगदी गॅरेज जवळच गाडी आली आणि बरोबर त्या दुकानाच्या समोरच बंद पडली दहा ते पंधरा मिनिटे प्रयत्न केला पण सुरू होईना नंतर रस्त्याच्या एका व्यक्तीने काहीतरी सांगितलं पण ते काही भाऊजींना समजले नाही पण तो माणूस तिथून निघून जाताच गाडी सुरू झाली. हवा चेक केली आणि भाऊजींनी गाडी घराच्या दिशेने वळवली आई म्हणाल्या का रे इकडे का तेव्हा ते म्हणाले रस्त्यात कुठे बंद पडली तर काय करायचं, ही गाडी ठेवूयात आणि मित्राची घेऊन जावूयात. गाडी विषयी काही चर्चा झाल्यानंतर प्रज्ञाच्या (जाव) दाजींची गाडी आणायचं ठरलं आम्हा सर्वांना घरी सोडलं तेव्हा दोन वाजले होते घराचं लॉक काढून आम्ही सर्वजण घरात आलो व भाऊजी गाडी आणायला तिच्या ताईच्या घरी गेले. मुलं लहान असल्यामुळे त्यांना भूक लागली असावी म्हणून ती रडत होते म्हणून दोघांनाही दूध दिलं त्यांना शांत करते, तोपर्यंत आईना माझ्या सासूबाईंना उलट्या सुरू झाल्या. उलट्या करून अशक्तपणा आला होता. जवळजवळ साडेतीनला हे लोक गाडी घेऊन आले सामान आमच्या गाडीतून उतरवून त्या गाडीत ठेवलं आणि आम्ही बसणार तेवढ्यात आई म्हणाल्या तुम्ही लोक जावा मला बसायला जमणार नाही पण; त्यांना एकटीला पण ठेवून जाऊ शकत नव्हतो म्हणून पुन्हा घरात आलो भाऊजी आईना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले . सगळी हॉस्पिटल पालथी घातली पण कोणताच डॉक्टर नव्हता घरी आले पाचला हॉस्पिटल उघडलं तर मेडिसिन घेऊ नंतर गावी जाऊ असे ठरवलं. माझे मिस्टर पोलीस आहेत आणि ते चंदगडला असतात त्यांना फोन केला आणि विचारल तुम्ही कधी येणार आहात तेव्हा ते म्हणाले माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर येणार आणि टेस्ट निगेटीव्ह आली होती पण त्यांना यायला आठ वाजणार होते. रात्री उशिरा निघायचं ठरलं पुन्हा चेंज सकाळी लवकर ऊठून दोघेच म्हणजे माझे मिस्टर आणि भाऊजी जाऊ देत, आपण सगळे नंतर जाऊ असं आण्णा म्हणाले कारण आईंना विशेष असा फरक पडला नव्हता त्यांना अशक्तपणा खूप होता.त्याना धक्का बसला होता अचानक त्यांची मोठी जाऊ आपल्यात राहिल्या नाहीत याचा तेवढ्यात सहाच्या दरम्यान सीमाताईंचा फोन आला का आला नाही आमच्या वारलेल्या सासू बाईंची मोठी सून सर्व हकीकत त्यांना सांगितली त्या बोलल्या यावेच लागेल कारण सकाळी पाणी घालायचा कार्यक्रम असतो तेव्हा सगळे लागतात. सकाळी लवकर तर या मग मी हो म्हणाले आई आणि भाऊजी दवाखान्यातून आले सर्व सांगितले पुन्हा चेंज सकाळी पाचला बाहेर पडायचं ठरलं सारखे संकेत मिळत होते मला समजत होतं पण कुणालाच उमजत नव्हतं मी बोलले की प्रज्ञाला म्हणजेच माझ्या लहान जावेला आपण मांगरूळला जायाला नको म्हणून असं सकाळ पासून काहीतरी आडवं येत आहे. मुलं झोपेपर्यंत बारा वाजले यांना बोलले अलार्म लावा सकाळी लवकर उठायचं आहे. मांगरूळला जायचं आहे यांना काही कल्पनाच नव्हती सर्वजण जाणार आहोत याची, मला कसं कोण बोललं नाही मला वाटतं त्यांना सांगितलं असेल,कारण ते दोघेच जाणार होते अस ठरवल होत.साडेबारा ला सगळे झोपलो तोच तीनला सागर कुंभार चा फोन आला वैभव दादांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला होता. Oximeter द्या म्हणून काय झाले असेल या टेन्शनने झोपच उडाली मग काय विचार करता करता चार झाले उठून आवराआवर केली पाचला तर बाहेर पडणार होतो ,हे पण गडबड करून आवरायला आले पण भाऊजी म्हणाले तू माघून ये गाडीवरून कारण गाडीत 5 च सीट बसतात. हे थांबले आम्ही निघालो कारण ह्यांनी चंदगड ते कोल्हापूर तीन तासाचा गाडीवरचा प्रवास करून आले होते त्यात डे आणि नाईट झाली होती थोडा आराम करून ते निघणार होते आम्ही पाच ला घरातून बाहेर पडलो साडेसहाच्या दरम्यान मांगरूळला पोहोचलो वाड्यात पाऊल टाकताच काकू दरवाजात दिसायच्या पण आज त्यांचा फोटो पाहताच काळजाचा ठोका चुकला कुणी कसं असं अगदी अचानकपणे कुणालाही न समजता निघून जातं याच्यावर विश्वासच बसेना खूप वाईट वाटलं कारण त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं कारण हा भयानक रोग माणसाला माणसापासून तोडत होता रोगाच्या त्रासापेक्षा एकटे पणाच्या भीतीने हजारो लोकांचे प्राण गेले होते. यश माझा छोटा मुलगा सव्वा वर्षाचा होता तेव्हा तो गेल्यापासून खूप बेचैन होता त्यालाही काही समजत नव्हतं काय होतय ते, कोणाकडेही गेला नाही फक्त रडत होता पोट गच्च असेल कदाचित म्हणून ओव्याचं पाणी पाजलं पण तरीही काही त्याच्यावर फरक पडला नाही नंतर औषध दिल्यावर थोडा शांत झाला. पुन्हा कोल्हापूरला जायचं ठरलं. पण जाता जाता वाटेगावला म्हणजे माझ्या माहेरी आजीला भेटून जाऊयात असं म्हणाले पण कोण्हीच मनावर घेतलं नाही मला माहित होतं भाऊजींना बोलले तर ते नाही म्हणणार नाहीत शेवटी त्यांना म्हणाले अण्णांना विचारलं तर ते पण म्हणाले जाऊयात. दोन वाजले होते पुन्हा विघ्न आमची गाडी येताच समोर झाड पडलं तिथे वीस मिनिटे केली पण वेळ झाला तरी गेलोच सर्व वाटेगावला. मिस्टर काय नाही आले त्यांचं काहीतरी काम होतं, आजीला व आई-वडिलांना भेटून खूप दिवस झाले होते त्यांना भेटून छान वाटलं आम्ही सहाला पुन्हा रिटर्न कोल्हापूरला जायला निघालो घरी आल्यावर जेवण केलं मला खूप त्रास व्हायला लागला होता तरीही सर्व आवरा आवर करून च झोपले. सकाळी तर यशची तब्येत बिघडली जुलाब ताप सुरू झाला होता रविवार डॉक्टर नसतात घरातील सिरप दिला सोमवारी डॉक्टर राहुल पाटील आमच्या family डाॅकटरांना दाखवलं. इथूनच आमच्या खर्या त्रासाला सुरुवात झाली. इतके संकेत देऊनही आम्ही गावी गेलो आता काय होईल त्याला भोगायला ताकद जमवावी लागणार होती. त्यांनी बघताच सांगितलं तुम्ही आयसोलेट व्हा बाळाला आणि तिच्या आईला वेगळं ठेवा कोरोनाचा सिम्टम आहे. काळजी म्हणून किमान पंधरा दिवस तर वेगळं ठेवा. मनात धडकी भरली दुसरा कोणी आजारी पडलं तर टेस्ट करावी लागेल, आईंची नाही तर बाळाची त्याशिवाय एडमिट करून घेतात येत नाही आम्हाला. पाच दिवस लागले यशला फरक पडायला पण सहाव्या दिवशी जय चं म्हणजेच माझ्या मोठ्या मुलाची तब्येत बिघडली त्याला पुन्हा हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथे त्याची कोरोना अँटीबॉडी टेस्ट करायला सांगितली ती केलीही कारण वेळ घालवायचा नव्हता टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यालाही यश सारखाच त्रास सुरू झाला होता, सतत जूलाब व उलट्या सुरू होत्या आणि मला दोन्ही मुलांना सांभाळन कठीण होत होतं म्हणून मी यांना तुम्ही ड्युटीवर जाऊ नका म्हणून सांगितलं आणि ते त्यांनी तसं कळवलं ही आता टेन्शन वाढल डॉक्टरांनी सगळ्यांची टेस्ट करायला सांगीतली भिती होती आई आण्णांची यांना खूप टेन्शन आलं होतं पण मला दाखवत नव्हते मी काळजी करेल म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे स्वॅप देऊन आलो आई आण्णांसाठी खरी बोलावले प्रायव्हेट डॉक्टरांनी सोळाशे घेतले जाऊ दे त्यांना त्रास तर नको सरकारी रांगेत उभे राहिचा म्हणून आम्ही त्यांचा स्वॅप घ्यायला घरीच बोलावलं. त्यांना म्हणजेच माझ्या मिस्टरांना दुसऱ्या दिवशी खोकला सुरू झाला आम्ही दोघेही मुलांच्या संपर्कात होतो आणि मलाही थोडी सुरुवात झाली होती पण एवढा त्रास नव्हता मी शंभर टक्के पॉझिटिव्ह असणार असं मला वाटत होतं पण; मला तीळ मात्र भीती वाटली नाही कारण हे माझ्याजवळ होते हसत हसत येणाऱ्या संकटाला सामोरे जायचं असं मनाशी ठरवलं होतं. रिपोर्ट दूसर्या दिवशी येणार असं सांगितलं पण हे दुसऱ्या दिवशी बघायला गेले तर माझा रिपोर्ट उद्या मिळनार अस सांगितल. मी आपली मागे आवरा आवर करत बसले आता जायचे ऍडमिट व्हायला पण नाही मिळाला रिपोर्ट. मी यांना बोलले दवाखान्यात जाताना दोघांनी जायच एकट्याने जायचं नाही तुम्ही माझा हात सोडू नका त्यांना स्वतः पॉझिटिव्ह असल्याची खात्री होती मलाही वाटत होतं आपणही पॉझिटिव्ह याव कारण जगायच तर ऐकमेकांसोबत आणि मरायच तर ऐकमेकांसोबत. मला काळजी होती ती माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला तर……

देवालाही आम्ही बरोबर अॅडमिट झालेल मंजूर नव्हत ह्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. हे खुश झाले मी निगेटिव्ह आले म्हणून मी मात्र आतून खचून गेले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून मी विचारल सिटी स्कॅन करूयात,आणि आजच उद्या नको ,कारण सापडेना म्हणून यशला कुठे ठेवायचं त्याला कोण सांभाळणार कारण तो पॉझिटिव्ह आणि लहान असल्यामुळे त्याला एकट्यालाही रूममध्ये ठेवून जाऊ शकत नव्हते यांच्या पोलीस स्टेशन मधले नऊ लोक कोरोना पाॅझिटिव्ह झाले होते.ते सर्व 6 वाजता संजय घोडावत ला अॅडमिट होण्यासाठी येणार होते मी पण त्यांच्या सोबतच जातो अस म्हणाले पण मी यश च कारण पुढ करून त्यांना थांबवल. आम्ही सातला एच आर सिटी करायला गेलो पण रिपोर्ट दुसऱ्या दिवशी सकाळी मिळणार होते आणि माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आता मला काळजी होती फक्त यांची कारण यांना खूप ताप येत होता तीन दिवस झाले रात्रभर त्यांचा ऑक्सिजन टेंपरेचर चेक करत होते. पटकन उठत होते दचकून कारण या आजाराची दहशतच एवढी होती. दुसऱ्या दिवशी लवकर आवरून हे निघाले त्यांना पाहताच आतून खूप भरून आलं होतं पण मी माझा हूंदका गीळत होते पण नाही सावरता आला घट्ट मिठीत जाऊन खूप रडले खूप समजावलं त्यांना आपलं ठरलं होतं ना बरोबर जायचं मला का एकटीला ठेवून निघालात त्यावर ते म्हणाले तू निगेटिव्ह आलीस, नाही नेता येत तिथे तुला रिपोर्ट आला की या मग संजय घोडावतला तिथे चांगली सोय आहे आपल्या पोलीस लोकांसाठी मला आता एकच आशा होती रिपोर्टची पण इथेही नशिबाने धोका दिला मी पुन्हा निगेटिव्ह आले खोकला खूप वाढला होता एक कारण पूरेस होतं तरीही HRCT report निगेटिव्ह आला पण त्यामध्ये समजल की माझ्या फुफुसात कसल्यातरी गाठी आहेत जुन्या आजाराच्या एकतर निमोनियाच्या नाहीतर T.B च्या याच्याबद्दल काही जास्त सांगितलं नाही. मला काही त्रास झाला तर औषध घ्यायचं असं सांगितलं. हे ऍडमिट झाले त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली पण ताप अजूनही येत होता तिसऱ्या दिवशी अण्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांची HRCT केली होती त्यांना ऍडमिट केलं आता टेन्शन खूप वाढलं कारण त्यांना बीपी शुगर आहे पण त्रास काही नव्हता 5 दिवस औषधांचा कोर्स पूर्ण केला नंतर कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट ही निगेटिव्ह आली एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी सोडलं. मिस्टरांना पण औषधांचा कोर्स पूर्ण झाल्यावर त्रास कमी आहे म्हणून त्यानाही डिस्चार्ज मिळाला आण्णा एका रूम मध्ये मिस्टर वेगळ्या रूम मध्ये आणी मी दोन मुलांना घेवून एका रूम मध्ये अस आम्ही वेगवेगळ्या रूम मध्ये क्वारनटाईन होतो. मी मुलांना घेवून 29 दिवस एका रूम मध्ये होते कारण पहिल्यादा यश आजारी पडला नंतर सहा दिवस जय आजारी पडल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरचे नऊ दिवस आणि मिस्टरांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या नंतरचे ते पंधरा दिवस. हे 29 दिवस माझ्या आयुष्यातील खूप वाईट दिवस होते.प्रत्येक क्षणात भिती काळजी आणि जीवाची कसरत सूरू होती.मूल लहान होती छोटा दिड वर्षाचा व मोठा साडे चार वर्षाचा दिवस रात्र एकाच खोलीत बसून कंटाळली होती.खूप रडायची दरवाजा उघङावा म्हणून खिडकीतून हात बाहेर काढून आई ला काकांना विनवायची आम्हाला बाहेर यायच आहे का खोलीत बंद करून ठेवल आहे त्या नाजूक जीवांना कोरोना म्हणजे काय आहे ते पण समजत नव्हत.सकाळी मूल उठायच्या आधी उठून अंघोळ करायची जमेल तेवडी आवराआवर करायची पण कधी-कधी मी अंघोळीला गेल्यावर छोटा उठून बसायचा पण दरवाजाला बाहेरून कडी घालून गेल्यामूळे मी येईपर्यत रडत बसायचा.बाहेरून लोक त्याला रडू नकोस रे बाळा समजवण्याचा प्रयत्न करायची पण तो समजण्याच्या मनस्थीतीत नसायचा.जेवन होईपर्यंत मूलांना भूक लागेल म्हणून त्यांच्या आवडीचा सर्व खावू मोठा डबा भरून खोलीत दिला होता पण तरिही जेवणाची वेळ झाली की दरवाजा वाजवायची काकांना, काकीला आणि आईला हाक मारत रहायची आणि जेवन तयार आहे दरवाजा उघङा बोलल्यावर रांगत रांगत आपली ङिश घेवून मला पहिला म्हणून पालथी मांडी घालून केवीलवाल्या नजरेन काकांकडे पहायचीत. जवळ जवळ 29 ते 30 दिवस आमच्या रेटिंग मध्ये काही चेंज नव्हता.आत आम्ही बेचैन होतो आणि बाहेर माझी मानस,त्यांनाही खूप त्रास होत होता रडणारी मूल, आण्णा आणी मिस्टरांना होणारा त्रास बघून पण आई,भाऊजी आणि प्रज्ञा ने कधीच चेहर्यावर दाखवून दिला नाही सतत आमच्या समोर येताना हसत मूखाने येत असत.कारण मला खोली बाहेरील परिस्थितिचा अंदाजही येवून दिला नाही.ह्या सगळ्यात भाऊजींची तारेवरची कसरत होत होती ह्याची मला कल्पना होती.

घरी आल्यावर मिस्टरांचा त्रास खूप वाढला, खोकला खूप वाढला होता.एखदा खोकल्याची उसळी आली की श्वास च घेता येत नव्हता.म्हणून भाऊजी म्हणाले वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही आणि एच आर सी टी करायला घेवून गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एडमिट झाले त्याच हॉस्पीटल मध्ये. तारीख 30 सप्टेंबर तीच ट्रीटमेंट रिपोर्ट नॉर्मल पण यांनी खूप टेन्शन घेतलं आहे असं डॉक्टरचं म्हणणं होतं.मला काहीच कळायला मार्ग नव्हता कारण मी तर रूम मध्ये काॅरनटाईन होते खोकलेला आवाज फक्त कानावर येत होता.माझी खूप इच्छा होती फक्त एखदा जावून त्यांना भेटाव पण नव्हते भेटू शकत. माझ्या मनाची अवस्था मी शब्दात नाही सांगू शकत……

जेवणाची वेळ झाल्यावर ताट घेवून दरवजात बसलेला यश
दिवसभर एकाच खोलित बसून कंटाळून कपडे फ़ेकनारा यश

अॅडमिट झाल्यावर त्यांना पूढची ट्रीटमेंट सूरूच केलीच नव्हती.त्याच टैबलेट दिल्या जात होत्या. ते सांगत होते डाँक्टरांना मला काहीच फरक जानवत नाही उलट जास्तच त्रास होत आहे पण तिथे कोण्हीच लक्ष देत नव्हत. मला खूप टेंशन आल होत मी फोन केला तरी त्यांनी उचलला नाही,काल अॅडमिट झाल्यापासून फोन केला नव्हता आणि मी फोन केल्यावर उचललाही नव्हता. माझ्या मनात नाही नाही ते विचार येवू लागले.रात्रभर झोप नाही तोंडावर हात ठेवून हूंदका घालवत होते. मला कोण्हीच काही सांगत नव्हत,मला जानवल होत काहीतरी झाल आहे पण मला सांगत नाहीत.मी निलेश भाऊजीना फोन केला व सर्व काही सांगीतल ते म्हणाले मी फोन करून बघतो त्यांचाही फोन उचलला नाही मी सकाळी जावून स्वःता भेटून येतो व तूम्हाला काॅल करतो तूम्ही काही काळजी करू नका असा विश्वास दिला. मी देवाकडे फक्त एकच मागन मागत होते माझ्या नवर्याला बर कर, तू मला त्यांचा सर्व त्रास दे मी कसलीही तक्रार करनार नाही तूझ्याकडे अस विनवत होते. गुरुवारी एक ऑक्टोंबर ला सकाळी लवकर भाऊजी हॉस्पिटलला गेले होते त्यांना रात्री दीडला मेसेज आला होता त्यांचा मला झोप लागेना खूप त्रास होतोय सकाळी सहाला पुन्हा मेसेज ओवारेस घेऊन इलेक्ट्रॉनिक पावडर घेऊनही खूप विकनेस आलाय भाऊजी सकाळी सहाला तर हॉस्पिटलमध्ये पोचले होते. त्यांची स्थिती बघून खूप घाबरले होते ताबडतोब तिथली प्रोसिजर आवरून बिद्रीला प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन गेले तेवढ्यात निलेश नाजरे यांचे मित्र यांनी एप्पल हॉस्पिटल सुचवलं तिथे पोलीस लोकांसाठी फ्री मध्ये उपचार आहेत म्हणून तिकडे घेऊन गेले तिथे थांबून अर्धा तासा नंतर सांगितलं बेड उपलब्ध नाही भाऊजींनी कसलाही वेळ न घालवता बिद्रीला घेऊन गेले तेथे ट्रीटमेंट सुरू झाली माझ्या जीवात जीव नव्हता बुधवारी रात्री कॉल केला नाही गुरुवारी नाही मी केला तर उचलतही नव्हते फोन, नेमकं कळायला मार्ग नव्हता यांना ऑक्सिजन लावला होता आयव्ही चढवल्या नंतर थोड्या वेळाने शांत निवांत पडले होते असे भाऊजी बोलले. खूप काही सांगत होते यांना खूप वेळा भरून येत होतं पण मन घट्ट करून बोलत होते शेवटी प्रशांत माळकर ला भाऊजींचे मित्र सांगितला जा रे तू भैय्याला बघून ये कारण भाऊजींना त्यांचा त्रास बघवत नव्हता ते भेटायला गेल्यावर त्यांना हे म्हणाले आता मी रिलॅक्स झालोय त्रास खूप कमी वाटत आहे ऑक्सिजन लावल्यामुळे भाऊजी मात्र खिडकीतून चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही न दाखवता पहात होते आतल्या आत हुंदका गिळत होते. त्यांना हवेशीर खोली मिळावी याची खबरदारी घेतली खिडकी कडेला बेड असावा अशीच जागा घेतली. भाऊजींना हे सगळं सांगताना आतुन भरून येत होतं पण हा बांध तेव्हा तुटला जेव्हा त्यांचा फोन भाऊजींना आला त्यांचे ठोके वाढले होते गळा भरून आला होता त्यांनी प्रज्ञाला फोन दिला मी झोपलोय म्हणून सांग म्हणाले तीन तसंच सांगितलं आणि आईना फोन दिला आई सावरत बोलल्या बरा आहेस का त्यांनी सांगितलं आता बरं वाटतंय काळजी करू नकोस फोन ठेवला आणि भाऊजींचा रिकामा झाला हुंदका देऊन देऊन रडत होते अगदी लहान बाळासारखं खूप रडले आपल्या भावाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आणणारा भाऊ माझ्या समोर होता खूप धडपड केली बिचाऱ्याने त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठीही खूप रडले सावरायला पुढे जायला एक पाऊल टाकलं पण मीही क्वारनटाइन होती माझ्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको म्हणून तिथेच थांबले आई मी भाऊजी खूप रडलो अगदी मन मोकळ होईपर्यंत माझ्या मनात भाऊजींबद्दल खूप आदर होता पण आता ते ठिकाण मोजण्या पलीकडचं आहे असा भाऊ असा दिर असा मुलगा असा नवरा आणि असा निस्वार्थीपणाने प्रेम करणारा काका भाग्यवंतांनाच मिळतो आणि आम्ही सगळे खूप नशीबवान आहोत कारण भाऊजीं च्या रूपाने देवानेच अवतार घेतला होता वाचावणारा तो असला तरी वाचवण्यास भाग पाडणारा आमच्यातला माणसातला देव आमच्या समोर होता. एका तासाने मलाही यांचा फोन आला मी बरा आहे मला फ्रेश वाटतंय काळजी करू नकोस मला गोळ्यांमुळे झोप येते. माझी झोप पूर्ण झाल्यानंतर फोन करतो आणि फोन ठेवून दिला मी बाहेर जाऊन सांगितलं त्यांचा फोन आला होता मी बरा आहे म्हणून हे ऐकताच भाऊजी लहान बाळा सारखे अगदी मन मोकळ होई पर्यंत रडले. किती समजावलं तरी थांबतच नव्हते त्यांना आनंद झाला होता माझ्या भावाचा त्रास कमी झाला आहे याचा.तो सूखरूप आहे याचा, असा नाजूक दिवस जीवनात कधीही येऊ नये पुन्हा आमची नाती घट्ट झाली होती. आज आम्ही जे काही आहोत फक्त तूमच्या मूळे ,आमच्या आयुष्यातल सुख तूमच्यामूळे मिळाल आहे.आणि तूम्ही होता म्हणून आम्ही जिवंत आहोत भाऊजी. कारण या कोरोना ने दाखवून दिल जन्म दिलेल्या आई- वडिलाना नावारीस सारख अग्नी द्यावा लागला तर मूलगा असूनही स्वताच्या जीवाची काळजी करनारे माय बाप चार भिंतीच्या आत लपून बसले पण तूम्ही स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपल्या भावासाठी जीव धोक्यात घालून त्याला मृत्यूच्या जबड्यातून माग आणलंत.

कठीण प्रसंगी सागर कुंभार भाऊजी आणि प्रशांत भाऊजी सुरुवातीपासून आमच्या भाऊजीं बरोबर होते त्यांनाही खूप धन्यवाद. शुक्रवारी जेव्हा यांचा फोन आला तेव्हा मी त्यांना म्हणाले मला एकटीला ठेवून गेलात मला विचारलं तू बरी आहेस का तर मी बोलली अगदी व्यवस्थित माझा त्रास तुम्ही घेऊन गेलात पण तुमचा त्रास मला नाही वाटून दिला तर ते मला बोलले कसे

“काही गोष्टी वाटून घेता येत नाहीत ज्याचं त्यानेच भोगायचं असतं” ……..

✍सौ.शितल कृष्णा पाटील

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star