कधी कधी बोलण्यापेक्षा गप्प राहणच खूप चांगलं असतं
कारण न पटलेल्या गोष्टी बोलून दाखवण्यापेक्षा इग्नोर केलेलच बरं असतं
ती माणसं आपली असो वा दूरची वादाला शूल्लक कारण हवं असतं
म्हणून प्रत्युत्तर देण्यापेक्षा समजून घेण हे खूप महत्त्वाचं असतं
समोरच्यान ताट मान केली तर दुसऱ्याने थोडसं नमत घ्यायचं असतं
अहंकार (इगो )बाजूला ठेवून आपणच आपल्या माणसासाठी थोडं छोटं होऊन नातं टिकवायचं असतं
कारण
काचेला गेलेला तडा जसा भरून येत नाही तसाच नात्यात निर्माण झालेला विश्वासाचा दूरावा कितीही सारवासारव केली तरी कुठेतरी मनाच्या कोपर्यात घर करून बसतो आणि त्या गोष्ठीचा आयुष्याभर विसर पडू देत नाही.
म्हणूनच समोरच्याच मन दूखवण्यापेक्षा त्याच मन जपन कधी ही उत्तमच.
काय पटतय ना…..👍
✍सौ.शितल कृष्णा पाटील