लग्नाला आपल्या आज पंधरा वर्ष झाली
प्रत्येक सुख दुःखात तूझी मला आणि माझी तूला नेहमीच साथ राहीली
पण तरिही कुठेतरी आपल्या आयुष्याच्या गणिताची पायरी चूकत गेली
सारी सूत्र बरोबर होती, सूखाची बेरीज ही होत होती, आणि
दू:खाची वजाबाकी ही होत होती पण; उत्तर मात्र समाधान येत नव्हत
कारण फक्त एकाच बाजूनेच मनातील विचारांच्या अंकाची भर पडत होती साथीला तूझ्या अंकाची उनीव भासत होती
मग कस काय आपल गणित सूटणार
आणि जे मानसिक समाधान म्हणतात ना ते कस भेटण्यार
आपल्या संसारासाठी दोघांनी खूप कष्ट केले,आपल्या मुलांना चांगलं आयुष्य लाभाव म्हणून खूप प्रयत्न केले
खूप काही सांगायचं होतं तुम्हाला मनातलं पण बोलताना शब्दांचा सूर बदलला ना वादच होतात
म्हणून खास या दिवशी मनातलं बोलायचं ठरवलं पण तेही लिहून
अगदी बारावी नंतरच माझं लग्न झालं, संसार म्हणजे काय असतो तो खरं लग्न झाल्यावर समजलं
शिकण्याची खूप इच्छा होती पण आता वाटलं सारं काही संपलं, पण तुमच्या सपोर्टमुळे मी मात्र अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं
खूप तारेवरची कसरत होत होती माझी, लहान मुलगा आणि कॉलेज या दोन गोष्टी सांभाळताना कधीकधी मनस्थिती बिघडत होती माझी
कधी -कधी सावरून घेतलत, पण कधी कधी मी कशी चुकते हेच फक्त दाखवत राहिलात
लढण्याची ताकद होती माझ्यात, फक्त विश्वासाची ढाल हवी होती तुमच्या रूपात, आणि तोही विश्वास नेहमीच हवा आहे मला माझ्या आयुष्यात
तो विश्वास तूम्ही दिलात म्हणूनच छोटासा का असेना पण बदल घडवू शकले मी माझ्या संसारात
माझ माहेर, माझी माणसं, माझे आई-वडील सारं काही सोडून आले तुमच्यासाठी, फक्त तुमच प्रेम आणि विश्वास हवा होता मला माझ्या आयुष्यासाठी
नाही मला जास्त अपेक्षा तुमच्याकडून, फक्त एकदा तुम्ही स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून तरी बघा, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा,
दिवसभर तुम्हीही कामावरून दमून येता, मी ही घरातील कामे आवरून कामावर जाते, मग मला ही कामावरून आल्यानंतर कंटाळा येत नसेल ना
पण आल्यानंतर मी माझी माणसं, माझं घर म्हणून सारं काही करत असते पण तरीही तुम्हाला मी कुठे चुकते याचीच जाणीव करून द्यायलाच हवी का,
होतात हो अशा काही किरकोळ चूका पण नेहमीच वादाला कारण असाव का, कधी कधी तूम्ही ही चूकता तर मी तूम्हच्याशी अबोला धरावा की भांडत बसाव का
फक्त दिवसभरातील काही वेळ मला द्यावात, मनमोकळ्या गप्पा माराव्यात, तुमचं गप्प राहणं मला आवडत नाही, कारण माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय जवळच कोण्हीच नाही
मला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा जरा, आठवा ना शेवटचा केव्हा आणला होता तूम्ही गजरा
मोठमोठे गिफ्ट ची अपेक्षा च नाही मला, फक्त तुम्ही असावा सोबत स्पेशल डे ला
तुम्ही तुमचा बर्थडे सेलिब्रेशन नेहमी मित्रांबरोबर करता, कधी बायकोबरोबर सेलिब्रेट करावासा वाटत नाही का
बायकोसाठीही खास वेळ असावा ना तुमच्या आयुष्यात, न सांगता कधीतरी तुम्हाला कळावं ना काय आहे माझ्या मनात
तुमचा बर्थडे असो वा आपली एनिवर्सरी फक्त तुम्ही माझ्यासोबत असाव, गिफ्ट काही दिले नाही तरी चालेल फक्त तो दिवस एकमेकांसोबत जगाव
बायकोलाही मन असतं कधीतरी तिचं मन हे जपावं, तिला जवळ घेऊन कधी प्रेमाने बोलावं
तिच्या चुका काढण्यापेक्षा तिला समजून घ्यावं ,घरातली प्रत्येक गोष्ट फक्त तीनच करावी असं बंधन नसावं
कधी आजारी असली तर तू आराम कर असं वरवरचं तरी म्हणावं
कारण या काळजीच्या शब्दातही अर्ध बळ तिला मिळाव तूझ माझ नात नव्यान घडाव
सांग ना कधी समजून घेशील तू मला, का समजूनच घ्यायचं नाही तुला
अरे प्रत्येक गोष्टीत कोम्प्रमाईज करत आली आहे, कधीतरी आपल्या मनासारखं होईल असं स्वतःलाच मोटिवेट करत आली आहे
मला आयुष्य घालवायच नाही ते जगायच आहे आणि तेही तुमच्याबरोबर ,
राग आला तर तू मला बिंदास बोलून दाखव पण तरिही मी खरच चूकते का याचा रिप्लाय जरूर पाठव
पंधरा वर्षाचा अनूभव साथीला घेवू, नव्याने नात्याला सुरुवात करू
फक्त तूझी साथ हवी आहे, आपल्या बरोबर आपल्या मूलांचही आयूष्य दोघांनी मिळून घडवू.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील.