
सांग ना तू स्वतःसाठी कधी जगणार, इतरांचं मन जपता जपता अर्ध आयूष्य सरल मग तू स्वतःच्या मनाच कधी ऐकणार
सांग ना तू स्वतःसाठी कधी जगणार …..
आयुष्य हे क्षणभंगुर आहे ; तू उद्याची काळजी करू नकोस, आजचा दिवस तू जगून घे इतरांसाठी तू तुझ्या मनाला मुरड घालू नकोस
तुझ्या मधल्या तुलाच तू चार भिंतीमध्ये कोंडू नकोस, मोकळा श्वास घेण्यास आता तू दबकू नकोस
सर्वांची काळजी करता -करता डोक्यावरचे केस ही पिकले चणे खायची इच्छा धरता- धरता होते नव्हते ते दात ही पडले
कोण काय म्हणेल याचा विचार तू अंधारात सोडून दे,तूला काय वाटत ते तू बिंदास कर, तूला वाटणारी भिती त्याच अंधारात कैद कर
आयुष्य एखदाच मिळत मनाप्रमाने जगून घे,दुनियादारी करण्यापेक्षा स्व:ताच्या आयुष्यात तूला हव तस रंग भरून घे.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील
You must be logged in to post a comment.