रोज पाहतो तुजला मी चोरूनी
माझ्या डोळ्याच्या कोणातूनी
आज ठरवलं नजरेस नजर मिळवावी
पण समोर तू येताच धडकी का भरावी
एक इशारा करून तुजला पाऊल पुढे मी टाकला
थरथरनारे पाय आणि वाढणार्या श्वासाला गाठ मारूनी
मान उंचावून नजरेस तुझ्या मी नजर दिली
तेव्हा मनात दबलेल्या प्रेमाच्या तरंगाने मनालाच जोराचा झटका देऊन जागे केले
तेव्हा स्वप्नांचा चूराडा करून डोक्यावरील केस उभा राहिले
कारण:-” जो आग ईस पार लगी थी वो आग उस पार भी जली थी”
चोरून पहाण्याच्या नादाने तिचे डोळे झाले होते तिरळे नजरेस नजर मिळताच न सांगण्यासारखे माझे काय हाल झाले
पाहत होती ती माझ्याकडे, पण इशारा होत होते माझ्या मित्राकडे
म्हणून म्हणतो, प्रेम करावं पण उघड्या आणि सरळ डोळ्याने नाही तर तिरळी प्रेयसी पडते गळ्यात धोक्याने.
✍ सौ. शितल कृष्णा पाटील