
आज कशावर कविता लिहावी हेच समजेना , किती विचार केला पण काहीच सुचेना
प्रश्न साधा – सोपा होता पण उत्तर सापडेना बुद्धीला खूप ताण दिला पण काहीच आठवेना
मनाला शांत होण्यास सांगितलं पण ते ऐकना काय सुचल ते लिही म्हणून पेन हातात दिला पण ; लिखाणाच्या वहीचा थान पत्ताच लागेना,
सारं काही बाजूला ठेवून अंथरूणावर पडले तेवढ्यात काहीतरी वेगळेपण सुचले,
विषयच कशाला हवा कविता करायला विषयाशिवाय सुचत का पाहू आज मनाला ,
असं म्हणता म्हणता चार ओळी सुचल्या कागदावर लिहून कविता म्हणून रचल्या,
कधी कधी विषयाशिवाय लिहिता आलं पाहिजे मनाची अशी ही अवस्था होते तीही मांडती आली पाहिजे,

विचार करून लिहिणारे सगळेच असतात पण विचार न करता लिहिणारे लेखकच नसतात,
कारण काहीतरी लिहायला सुचायला तर पाहिजे आणि सुचलं तर ते कागदावर मांडायला आलं तर पाहिजे,
वेगळ काही सुचलं म्हणून ते कागदावर उतरवलं पण ; आता कवितेला नाव काय द्यावं याचे उत्तर पुन्हा कोड्यात पडलं.
You must be logged in to post a comment.