
तुला पाहण्यासाठी दररोज मी स्टॅन्ड वर बसून तासन तास घालवत होतो, वाट तुझी बघता बघता शेवटची ही बस सोडत होतो
आता काय येणार नाहीस म्हणून पास फुकट घालून रिक्षाला 17 रुपये देऊन अर्ध्या लेक्चर पर्यंत पोहोचत होतो, कॉलेजचा जिना चढून वर येताच खिडकीतून तू दिसावीस म्हणून डोकावून तुला शोधत होतो
तू दिसताच सतरा रुपये केल्याच दुःख विसरून जायचो एकदा माझ्याकडे बघून हसावस म्हणून मुद्दाम ठेच लागल्याचं नाटक करायचो
आता तरी विचारशील लागलं काय म्हणून असं माझं मीच मनाशी ठरवत बसायचो, पण तुझ लक्षच नसायचं आणि मी उगाचच पायाचे अंगठे सुचवून घ्यायचो
कॉलेज सुटताच उगाच तुझ्या माग पुढं फिरायचो, तुला बघून माझं मीच मनातल्या मनात हसायचो
भीती वाटत होती काय रिऍक्ट होशील माझ्याशी, कितीतरी वेळा बोलण्याचा प्रयत्न केला मी तुझ्याशी
एसटीमध्ये कधी तू पहिल्या सीटवर असायचीस आणि मी शेवटच्या सीटवर असायचो तर, कधी तू शेवटच्या सीटवर असायचीस आणि मी पहिल्या सीटवर बसायचो
फक्त तो योगायोग असावा की काय माहित नाही पण मला माहित आहे तू ही माझ्याकडे माझ्या नकळत मला पण पाहायचीस, मी बघताच तू नजर दुसरीकडे फिरवायचीस

दिवसा मागून दिवस गेले ,कॉलेजचे दिवसही संपले , ना तू काही बोललीस आणि नाही मी काही बोललो, वर्षभर फक्त नजरेने एकमेकांकडे पाहतच राहिलो
मनात काय होतं ते तुला सांगायचं राहूनच गेलं तू पास होऊन पुढ गेलीस पण जाताना माझ्या आयुष्याच गणित चूकवून गेलीस.
बर्याच वर्षान पून्हा तू त्याच स्टॅन्ड वर दिसलीस पून्हा भरलेल्या जखमांवरची खपली काढून माझ्याकडे बघून हसलीस.
आता काहीच पर्याय उरला नव्हता कारण तूझ्या मूलांनी मला त्यांचा मामा केला होता ….मला त्यांचा मामा केला होता.
You must be logged in to post a comment.