
आयुष्याच्या तारकांमधील एक हक्काचा तारा असाही आहे तो त्याच्या जन्मापासून माझ्या अगदी जवळ आहे
कधी रूसायचा, कधी पोट दूखे पर्यंत हसायचा, तर कधी कंटाळा येईपर्यत रडायचा,
“बालिश” मन साफ असणारा, रागात बोलणं असो वा चेष्ठेतल बोलणं सारच खरं मानणारा
छक्केपंजे म्हणजे काय असतं याचा अंदाजही नसणारा हळवा, प्रेमळ, निरागस, लाजरा असणारा
एक तारा असा असाही आहे जो माझ्या खूप जवळ आहे तू माझ्या खूप जवळ होतास, जवळ आहेस आणि नेहमीच जवळ असणार आहेस
त्याला छोटा भाऊ येताच आपण एकटे पडलो याचे विचार मनात घोळू लागले ,कारण माझ्या पेक्षा आता जास्त लाड त्याचेच होवू लागले
प्रत्येक गोष्टीत आता वाटणी होऊ लागली माझे आई-बाबा माझी मानस आता त्याचीही झाली
त्याची काही चूक नव्हती मीच कुठेतरी कमी पडत गेले , कारण लहान बाळाला वेळ देता देता त्याला सतत गृहीत धरत राहिले
एकटा असताना हे सार आकाश आपलंच आहे अशी त्याची समजूत झाली होती, आपल्या त्रिकोणाचा चौकोन करायची त्याची मूळीच इच्छा नव्हती
चिमुकली पावले आईच्या कुशीत पाहताच तो आईच्या जवळ येण्यास दचकू लागला, तेव्हापासून तो जीव लावलेला तारा हळूहळू मनान लांब होऊ लागला
शरीराने जवळ असला तरी तो मनाने खचू लागला , आई त्याचाच लाड करते आणि माझा द्वेश करते असा समज करून बसला
त्याला समजवण्यासारखं त्याचं वयच कुठे होतं , आईला दोन्ही मुलं सारखेच असतात त्याला कळतच कुठे होतं
किती समजावलं तरी तो स्वतःला एकटाच म्हणत होता, आपल्या लहान भावाला तो सतत कोसतच होता
पण अचानक त्याला आईच्या दुराव्याची स्वप्न कहानी पडली ओक्साबोक्सी रडून त्याने मला घट्ट मिठीच मारली
“आई मी चुकलो ग मी तुला खूप त्रास दिला मी तुझाच आहे” आणि लहान भावाची सावली बनला
आई मला तू कधीच अंतर देऊ नकोस मी नाही त्रास देणार तूला ,पण मला कधी सोडून जाऊ नकोस
या चिमुकल्या मनान एवढ मोठ कस व्हाव, अचानक आईच्या दुराव्याची भीतीन घाबरून का जाव
हा निरागस जीव आपल्यातील नाही असा तो मानत होता , आपल्या तारकांच्या मैफिलीत त्याला घ्यायलाच तयार नव्हता
आज त्याच्या मनाचं खरं परिवर्तन झालं हा छोटा तारा आपला आहे हे त्याला कळून चूकल
आई मी खूप वाईट वागलो म्हणून त्यांन माझी माफी मागितली, मी तुला कधीच अंतर देणार नाही याची त्याने जाणीव करून दिली
बर्याच वर्षानंतर गैरसमजूतीचा दिवस तो मावळला होता, त्या अंधारात एकमेकांतील कडवटपणा वीरून गेला होता
आकाशातील तारखात एकच कल्लोळ माजला होता, माय लेकरांच्या प्रेमाचा वर्षाव होत होता
मनानं दुरावलेली नाती पुन्हा जवळ आली, दोन्ही मुलांबरोबर आमची चौकट पूर्ण झाली
खरच आई-वडिलांपासून दूर होण्याची भीती खूप वाईट असते, कारण आई-वडिलांची पोकळी आयुष्यात कधीच भरत नसते.
आई साठी सर्व मूल सारखीच असतात पण ही मूलच आईच्या प्रेमावर शंका का घेतात.कधी कधी आई ही चूकत असेल पण मूलांनीही आईला समजून घ्याव.कारण तूम्हाला वाढवताना खूप कष्ट घ्यावे लागतात पण त्या आईकडे या कष्टाचे हिशोब कुठे असतात.
✍सौ.शितल कृष्णा पाटील
You must be logged in to post a comment.