आयुष्यामध्ये हव तरी काय असतं ? “सुख ”
सुख म्हणजे तर काय असतं ? “समाधान”
समाधान म्हणजे तरी काय असतं ? “मनाची शांती”
मनाची शांती होणं कधीच शक्य नाही कारण माणसाची प्रवृत्तीच अशी आहे की कितीही मिळाल तरी अजून हवच असत , ओजंळीला गळती लागली तरी मन कूठे भरत
ज्याच्या मनात फक्त इच्छा आणि इच्छाच नांदते त्याच्या आयूष्यात अशांतता आणि सार दुःखच सामावते
त्याच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत मग शेवटी आयूष्यही संपण्याच्या मार्गावर येत तेव्हा, मरतानाही सुखाने मृत्यूला सामोरे जावे पण तिथेही जगण्याची इच्छा सुखाने मरूनही देत नाही.
म्हणून ; मानसाने समाधानी असाव वेळ आणि आयूष्य कधी निसटून जाईल याचा नेम नाही.आपल्याच मानसांबरोबर वैर करन यात कोणतच शहानपणा नाही.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील