दुसऱ्याचं किती ऐकावं याला काही मर्यादा असतात चुकीच्या सल्ल्यामुळे नाती नावापूर्तीच उरतात
आपलं म्हणणारी माणसं माझं, मीच म्हणू लागतात मग चार भिंतींच्या घरात गैरसमजाचे वारे वाहू लागतात
आणि या वाऱ्यासंगे अहंकाराची ठिनगी पडताच मनामध्ये ऐकमेकांबद्दल दुराव्याची दरी निर्माण होवू लागते आणि या नात्यामध्ये पडलेल्या दरीमुळे आपल्याच मानसांची ताटातूट होते
वेळीच सावध झालेल बर असत नाहीतर आपल्या रक्ताच्या नात्यात अंतर पडू शकत,
आयूष्यात कितीही पैसा कमवलात तरी हक्काची काळजी करणारी आणि काळजी घेणारी मानस विकत नाही घेवू शकत
कारण अशी मानस मिळायला भाग्य आणि टिकवून ठेवायला समजूतदार मन असाव लागत
फक्त स्वःताचा विचार करणारे लोक कधीच सूखी नसतात कारण त्यांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नसतात
म्हणूनच शेवटी ऐवढच सांगेल दुसर्याःच किती ऐकाव याला मर्यादा ठेवा कारण जेव्हा तूम्ही अडचणीत असाल तेव्हा हिच मानस पाठ फिरवतील आणि ज्यांना स्वार्थासाठी दूर लोटलत तिच तूमची हक्काची रक्ताची मानस धावून येतील.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील