कधी कधी आयूष्यात येतो असा मित्र जो खरच असावा का ?
ज्याच्याशी बोलून स्टैस कमी होवून मूड चेंज होतो अशी मैत्री करावी का?
आपल्यात झालेला चांगला बदल फक्त त्याच्या मुळेच असेल तर हा मित्र असावा का?
आपण मन मोकळ कराव आणि त्यानही ते मनापासून ऐकाव
पण ऐकता ऐकता त्यान गैरसमज करून घ्याव
आणि मैत्री च्या नात्याच ऊलंघन कराव
हे त्याने जानूनभूजून केल असेल वा न कळत त्याच्या व्हाव
पण हे न समजण्या ऐवढ अवघड कोड का पड़ाव
आपली अपेक्षा नसताना त्यान ऐवढ चांगल वागता वागता लिमीट क्राॅस का कराव
मग रागाच्या भरात आपण त्याला ब्लॉक करतो अस म्हनाव
पण कुठेतरी मनाच्या कोपर्यात त्यान का असाव
खरच आता मैत्री तूटेल म्हणून बैचेन का व्हाव
त्याच असाव की नको आपल्या आयुष्यात अस प्रश्न चिन्ह का उभ रहाव.
मैत्री होती आपल्याकडून निखळ पण त्याच्या मनातल कस ओळखाव
कारण फसवनारे आणि न कळत फसनारे चेहरे सारखेच असतात
म्हणून मैत्री करावी की नको असा प्रश्न निर्माण झाला
आणि या प्रश्नाच उत्तर खरच मला सापडेना.
✍सौ.शितल कृष्णा पाटील