फ्लॉवर आणि चटणीच आज भांडण झालं
तुटली आपली दोस्ती असं तीन घोषितच केलं
पडला प्रश्न फ्लाॅवरला आता काय करायचं
आयुष्यातलं तिखटाचं स्थान आता कुणाला द्यायचं
मनातल्या मनात मिरची खूप खूश झाली होती
जिगरी दोस्ती आज तिच्या डोळ्या देखत तुटली होती
सांतवन करायला तिने सुरुवात केली
फ्लाॅवरच्या मनात तिने थोडी जागाच बनवली
प्रश्न पडला आता त्याला कसा विश्वास ठेवायचा
कधी गोड, कधी तुरट, कधी तिखट, हिचा स्वभाव सरड्यासारखा रंग बदलनारा आपण कसा ओळखायचा
पर्याय आता काहीच उरला नाही कशीही असो ती वेळ आता काढायलाच हवी
म्हणून त्यान होकार दिला, जिरे मोहरीची टाकली फोडणी
खुश होऊन मिरचीने घेतली उड़ी
श्वासात साऱ्यांच्या झाली कोंडी
पटापट साऱ्यांना आल्या शिंका
सिद्ध झाली मिरची आता देऊन साऱ्यांना दणका
फ्लॉवर ही खुश झाला आहो साऱ्यांनी ऐका
मिरचीचा हिसका फ्लाॅवरला ठसका
✍सौ.शितल कृष्णा पाटील
खुप छान।
LikeLiked by 1 person