“मैत्री” आणि “प्रेम” वेगळं असतं

फक्त मैत्री म्हणून नात जोडल असताना .तिचा मनमोकळा स्वभाव त्याला प्रेम वाटू लागल पण ते एकतर्फी होत हे तिच्या लक्षात येताच तिला खूप वाईट वाटल आपल्या मनात फक्त एक निस्वार्थी भावना होती पण समोरच्याने चुकीचा समज करून घेतला म्हणून तिने मैत्रीला पूर्ण विराम द्यायच ठरवल आणि ते सांगत असताना तिच्या मनातली भावना मांडण्याचा छोटासा प्रयत्न.

आयुष्याच्या गाठोड्यात मैत्रीच एक पुस्तक सापडलं

वाचता -वाचता पुस्तक त्याचं आयुष्य आरशासारखं समोर दिसलं

उलघडत जाता सारी कोडी मैत्रीच एक नातं जडलं

मनातली भीती सोडून सारी तुला मी मित्र बनवल

आयुष्याचा सरळ रस्ता मी तुझ्यासाठी वळवला होता

कारण खरेपणाचा आरसा मी तुला समजला होता

बघता बघता आरश्यानेही का प्रेमात पडावं

बघणाऱ्याच्या नजरेला स्वतःहून का घायाळ करावं

मैत्रीच हे नातं त्याच्या कडून कुठेतरी हद्दपार व्हावं

शेवटी प्रेमाच का कुंपण दिसाव

मैत्री च्या या नात्याला कसलेही बंधन नसाव

म्हणूनच मैत्री आणि प्रेम यातला फरक कळावा

नात्यातला गुंता वाढण्याआधी तो सोडवावा

विपरीत सार घडणायाआधी सावध व्हावं दोघांनी

कारण आरसाही खोटं बोलतो आपली प्रतिमा उलटी दाखवूनी

समजून घ्याव दोन्ही मनांनी

कधी कधी आयुष्याच्या गाठोड्यातील पुस्तक बंद करून ठेवण्यातच शहाणपण असतं

कारण कधी – कधी वाहत्या पाण्याला थोपवून ठेवण्यातचं सगळ्यांचं हित असतं

आणि खरच

“मैत्री” आणि “प्रेम” वेगळं असतं

ज्याला कळत त्यालाच फक्त समजत

समजून न घेणार्याला नाही उमजत,म्हणूनच समोरच्याच फक्त ते एकतर्फी असतं.

✍ सौ.शितल कृष्णा पाटील

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star