त्यान अबोल राहून सगळ काही बोलून जाव
मनातल कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या डोळ्यात दिसाव
कदाचित हेच खर प्रेम असाव…..
समोर येताच त्यान हरवून जाव
शब्दांनाही कोड पडाव
व्यक्त तुझ्या पुढ कस व्हाव
ओठांनाही कापर भराव
पाहताच तूला मी लाजून बघाव
तूझा अबोल चेहर्याने सार काही सांगून जाव
खरच कदाचित हेच खर प्रेम असाव का ?
खरच कदाचित हेच खर प्रेम असाव…….?
✍ सौ.शितल कृष्णा पाटील