न दिसणारी गोष्ट किती त्रास देते
कधी जवळ तर कधी क्षणात दुनिया फिरून येते
मानसांच्या गर्दीत एकटी पडते
तर कधी एकटी असून गोंगाट निर्माण करते
प्रश्ना माघून प्रश्नांची उतरंडी बनवते
तर कधी उत्तरे स्वःताचीच मांडून बसते
कल्पनेतल्या दुनियेमध्ये रमते
तर कधी एकांतात गुस्मटून गूदमरते
कधी ती खूश होवून सैरभैर धावतें
तर कधी दुःखाला कवटाळून बसते
तिला वाटल तर ती वाट्टेल तेवढे कष्ट करून यश खेचून आणेल
आणि एखादी गोष्ट ठरवली तर होत्याच नव्हत करून सोडेल
अशी ही अदभुत ,अस्पष्ट ,अद्रुश्य, आणि अगणित गोष्ट दुसरी तिसरी कोण नसून आपल “मन” आहे.
ज्याच मनावर कंट्रोल आहे तोच खरा सूखी
बाकी सगळे एकाच माळेतील मनी म्हणजेच दुःखाचे धनी
✍सौ. शितल कृष्णा पाटील