संस्कार लहान मुलांवरचे

मुल एवढी हट्टी का असतात

जे सांगेल त्याच्या उलटच वागतात

कितीही समजवा ते आपलच खर करतात

आई-बाबा त्यांना त्यांचे वैरीच वाटतात

प्रत्येक गोष्ट त्यांना त्यांच्या मनाप्रमाने हवी असते

मिळाली नाही की संतापाने वातावरनच बदलून टाकते

चांगले संस्कार व्हावेत त्यांच्यावर ह्याच अपेक्षा आई वडिलांच्या असतात

पण मूलांना त्या गोष्ठी कुठे समजत असतात

जे नव्हत आमच्या नशीबात ते सार मुलांना मिळाव

जे जीवन जगलो आम्ही त्यापेक्षा सूंदर जीवन त्यांच असाव

पण पालकांकडूनही कधी – कधी चूक होत असते

प्रत्येक गोष्ट माघितल्या माघितल्या मुलांना द्यायची नसते

कारण किम्मत उरत नाही त्या वस्तुला

आणि कष्टाशिवाय गोडी येत नसते त्या भाकरिला

आजच्या पिढीला चांगल्या संस्काराचे धडे देने खूप गरजेचे आहे

आपल -आपल म्हणनारी पिढी हरवत चालली आहे

एक तिळ सात जन वाटून खाणार्यांची पिढी स्व :ताच च पोट भरू लागली आहे

हि मुल मी आणि माझाच विचार करू लागतात

एकत्र कुटुंब पद्धती मोडखळीस येवून पडतात

नात्यात दुरावा निर्माण होतो

प्रत्येकजन फक्त स्वःताचाच विचार करतो

वयस्कर आई-वडिलांना मुलगा आश्रमात ठेवतोय

गर्वाच्या पायाखाली निरागसपणा , निस्वार्थीपणा चिरडला जातोय

रक्ताची नाती दूषित होत चालली आहेत

स्वार्थी नजर आंधळी होवून आपल्याच मानसांच्या पाठीत खंजीर खूपसत आहे

अश्या या भरकटत चाललेल्या पिढीला रस्त्यावर आणन आपल काम आहे

विश्वासू आणि हळव्या भावनांचा खून करून रक्तबंबाळ करून मतलबी दुनियेत तडफडण्यासाठी मजबूर करण्यात येतय

म्हणून जिथे पावूल चुकेल तिथे रस्ता दाखवायच काम आपल आहे

नाही समज त्यांना एवढी अजून पण चांगले संस्कार तर आपण करू शकतो त्यांच्यावर

भूतकाळ घडून गेला पण वर्तमान बदलून भविष्यकाळाला उज्वल करू शकतो आपल्या मुलांच्या वर्तनांवरून

समाज बदलायचा असेल तर पहिला आपल्यात बदल हवा

बाल मनावरील चांगल्या संस्काराचा धडा प्रत्येक पालकांनी गिरवायला हवा

पैसा कमवण्याच्या नादात ही अनमोल गोष्ट हातातून निसटून जाईल याचा विचार असावा

वेळीच सावध झालात तर पूढच्या पिडीत प्रेम, माया,आपुलकीचा ओलावा शिल्लक राहील

आणि प्रत्येक मुलांचे आई-वडिल आश्रमात न रहाता आपल्या हक्काच्या घरी असतील.

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star