
पाऊलावरती पाऊल पडता पाऊल माझे का घुटमळते
मार्गावरती चालत असता वळणावरती का वळते
नजरेस तू ना पडता तुजला शोधण्यासाठी भिरभिर फिरते
दिसताच क्षणी लाजुनी मी चिंब चिंब भिजते
सांग प्रिया तुझ्या प्रेमाची लाली माझ्या गाली का उठते
न बोलताच सार काही डोळ्यांमध्ये दिसते
इशारा तुझा होताच काळजात मज धडकी अशी भरते
प्रेमाच्या या सागरात मी रस्ताच हरवून बसते
भानावर येताच मनास सावध हि करते
आई बाबांचा विचार करता आवर मनास घालते
करिअरच्या या वाटेवरती प्रेमाचे हे वळण नकळत येते
आयुष्य सार पडलय प्रेम करायला पहिला स्वतःच्या पायावरती उभा तरी राहते
नकारही नाही माझा पण नातं आपलं सध्या वेटिंग वरती ठेवते
असेल खरंच प्रेम तुझं माझ्यावर तर समजून मला तू घेशील
माझ्या या निर्णयात तुझी साथ मला तू देशील
पावलावरती पाऊल पडता उलट पाऊली परत येते
वळणावरती न वळण घेता रस्ता एकमार्गी धरते
नात्याला या फुलस्टॉप न देता काॅमा देवूनी जाते
पहिला करियर सेटल करू नंतर नात तूझ अन माझ कंटिन्यू करू अस वचन ही मी देते
शेवटची भेट ही आपली चल निरोप तुझा घेते
आयुष्यातील प्रेमाच्या ह्या पानाला तात्पुरती घड़ी घालून ठेवते.
✍सौ.शितल कृष्णा पाटील
You must be logged in to post a comment.