बोलताना समोरच्याच्या मनाचा विचार करावा
त्याचा स्वभाव कसाही असो पण तूमच्या आयुष्यात तो नेहमी असावा
क्षणाचा राग नात्यात दुरावा निर्माण करतो
आणि हा दुरावा जिवाला घायाळ ही करतो
कारण या आधी आपण त्याला जीव लावलेला असतो
सहज कुणाच्या सांगण्यावरून तडकाफडकी तो तोडायचा नसतो
नाती जोडन खूप सोप्प असत
पण ती टिकवून ठेवन तितकच अवघड असत
नाती आणि मानस जपावी
ईगो जरा बाजूला ठेवून स्वतः माघार घ्यावी
छोट्याश्या स्वार्थासाठी कुणालाच दुखवायच नसत
कारण
शेवटी जाताना प्रत्येकाला रिकामच जायच असत.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील