
जय,यश,हर्षु ही आमची घरातली सैना. आमच्या घरात शांतता चुकूनही नाही भेटनार कारण शांततेलाच धडकी भरते ह्या तिघांच्या नावान. आज घरातली मंडळी झोपली असता वेळेआधीच जय (वय 8 वर्ष) आला तो येण्यापुर्वी यश (वय4.8 आणि हर्ष वर 4.6 वर्ष) या दोघांना झोपवण्याचा प्रयत्न असतो त्याना पण झोपायच नसत ते दादाचीच वाट बघत बघत कधी झोपी जातात त्यांनाच नाही समजत. पण आज दादा वेळेआधीच घरी आला आणि सगळ्यांच्या झोपेच गणितच चुकल.म्हणून या प्रसंगावर सुचलेल्या काही ओळी.
अचानक वेळे आधीच एक वादळ गेटवर धडकलं, संकेताची जाणीव होण्याआधीच उंबरठ्यावर येऊन थडकलं
आक्रमक दोन सैन्य लढण्यासाठी सज्ज झाली, पाहताच क्षणी समोरच्याला अचानक फितूर झाली

गळाभेट करून आनंद व्यक्त करू लागलेली, जेव्हा दहशती खाली असलेले जनता नुकतीच झोपी गेलेली
आक्रोश होता अचानक सर्वांना धडकी भरली, दिवसभराच्या थकव्याने घेतलेली झोपच उडाली
राजा आणि प्रजा सारी कशी खडबडून जागी झाली, वेळेआधी आलेल्या वादळावर बरसून पडली
पण वादळ ही नादान होतं, शब्दांच्या बरसातीचा अर्थ लावण्यास , चुकून चुकल्यासारखं वाटलं प्रत्येकाच्या मनास
कारण वादळाला कधीच कोण्ही थोपवू नाही शकत कितीही केले तरी प्रयास, मग कशाला धरायचा हा निरर्थक हव्यास
येऊन द्यावं त्या वादळाला मनसोक्त, बरसून द्याव त्याला कोसळत्या सरीप्रमाणे मुक्त
कारण त्याच्यामुळेच तर राजाच्या महालात गारवा असतो मुलांशिवाय आयुष्याचा प्रवास फक्त एक वनवास असतो.

You must be logged in to post a comment.