काल त्याच वळणावर दिसली ती
घायाळ झालो पुन्हा एखदा मी
😍😍😍😍
तिच चमक तिच्या चेहर्यावर अजूनही होती
तिच लचक तिच्या चालण्यात जाणवत होती,
❤️❤️❤️❤️
वाऱ्यावरती झूलणारे केस अदाकारीत ती सावरत होती
गुलाबी गालावरती लाजरी smile खूलून दिसत होती,
🩷🩷🩷🩷
अजूनही तुझी आठवण येते असा चोरटा ईशारा करत होती
नवर्याकडे पहाता पहाता हळूच मला पारखत होती
💓💓💓💓
न बोलताही डोळ्यांनी ति बोलत होती
गुड मनातील ओठांच्या पेचात दाबत होती
🧡🧡🧡🧡
निसटून गेलेल्या आठवणी पुन्हा एखदा आठवत होती
अचानक सावध होताच दाटलेला हुंदका आणि डोळ्यात साटलेल पाणी झिरवत होती
💟💟💟💟
अजूनही ती तशीच होती………
अबोल राहून पुन्हा एखदा अशीच ती निघून गेली
भरलेल्या जखमांवरची खपली ती अलगत काढून गेली
🙁🙁🙁🙁🙁
पुन्हा एखदा त्याच वळणावर दिसली ती
सत्य नसूनी ते स्वप्न असावे….
असे समजावूनी पुन्हा एखदा बिखरन्या आधी सावरलो मी
✍️सौ.शितल कृष्णा पाटील.