बायको

बायकोलाही मन  असत.                                                 सतत तिला गृहित धरायच नसत

प्रत्येक गोष्टीत तिच मत विचारायच असत.                           कारण तिला ही निर्णय घेण्यात स्वातंत्र्य असत

सर्वांसमोर तिच्या चुका सांगून अपमानित करायच नसत          कारण तुमच्यावरून तुमच्याच बायकोची किंमत समोरच्या व्यक्तीच मन ठरवत असत

बायको ही नवर्‍याची अर्धांगिनी असते.                                 प्रत्येक सुख दुःखात तिची खंबीर साथ असते

मुला बाळांची आई असते,सासू सासर्याची सून असते,दिराची  भाऊजय असते,नंदेची वहिनी असते सारी नाती अगदी प्रेमाने जपते

तुमच्या साठी ति तिची सारी नाती माघे टाकुन नविन नाती जोडत असते

ती तिच्या ईच्छा अपेक्षा मारुन तुमच्यासाठी स्वतःला बदलत  असते

विश्वास फक्त तिचा कधी गमवू नका.                        मनमोकळे पणाने सार काही बायकोला सांगून टाका

गप्प रहाण्या पेक्षा व्यक्त व्हायला शिका.                          कारण तिच्या शिवाय कोण्हीच तुम्हाला समजू शकणार नसत

संसाराचा गाडा कोण्हीच एकटा चालवू शकत नाही.                 सोबतीला जोडीदार असेल तर कोण्हीच अडवू शकत नाही

म्हणून बायको ही बायकोच असते तिची तुलना कोणाशीच होवू शकत नसते

कमवत नसली तरी चोविस तास ऑन ड्यूटी वर असते.                                                                 कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्याच मानसांसाठी कना – कनाने झिजत असते

बायकोच घराच घरपण असते.                                           तिच्या असण्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती घरा पासून दूर जाते

सतत बायकोच्या चुका काढण्या पेक्षा चांगल्या गोष्टींची स्तुती करा

कधी कधी ईगो बाजूला ठेवून तिच्यासाठी थोडस नमत घ्या

कारण बायकोला खूष करण्यासाठी महागड्या गिफ्टची गरज नसते तुमचे कौतुकाचे चार शब्द ही पुरे असतात घरातील वातावरण बदलायला.

म्हणूनच कितीही प्रेम असो तिच्यावर  मनातल ओठांवर येत नसेल तर नात्यात काहीतरी उणीव भासतेच

कारण बायकोला कितीही माहित असल की आपल्या  नवर्‍याच आपल्यावर किती प्रेम आहे  तरीपण त्याच्या तोंडून ऐकण्यात जे समाधान मिळत ते बाकी कशात नसतेच.              

   ✍️सौ.शितल कृष्णा पाटील

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star