आयुष्य म्हणजे एक पांघरूण “
आयुष्याच्या गोधडिला रंगीबेरंगी नात्यांच्या टिपांची गरज असते
कारण प्लेन पेक्षा डिझायनर मध्येच खासियत असते
कुठे गैरसमज,अहंकार आणि स्वार्थी टाक्यांमुळे नाती उध्वस्त होतात
पण; जर तिथे प्रेम, माया आणि विश्वासाची हातशिलाई घालून नात्यांना घट्ट गाठ मारली की आयुष्यभर आपल्या माणसांची ताटातूट नाही होत.
फाटकी नाती जपण्यापेक्षा ती विचार विनिमय करून नवीन विश्वासाच ठिगळ लावून आपल हक्काच ब्रॅण्ड तयार कराव
कारण……
समाज्यात माघे खेचणारे खूप भेटतात आपल्याच मजबूत धाग्यांमध्ये गुंतागुंत करुन तोडण्याचा प्रयत्न करतात
म्हणूनच ज्याच्या त्याच्या मनाच मशिन त्याच त्याला चालवू द्याव कारण स्वःताच डोक अधिक वापरल्यास त्याच्या व आपल्या मनाच सेटिंग डिस्टर्ब होत
मग कुणा तिसर्याची मदत घेवून स्वःताच स्व:ताच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार घडतो.
म्हणूनच आयुष्याच्या गोधडीत रस्ता भरकटणार्याला व गरिबीच्या गारठ्यात गारठणार्याला ऊब देण्याचा प्रयत्न करावा
म्हणजे परमेश्वराने दिलेल्या आयुष्यरुपी गोधडीच सार्थक होईल. ✍️ सौ.शितल कृष्णा पाटील

छान…
LikeLike