सुख म्हणजे काय असत ?
सुख म्हणजे ईच्छा झाली की ती गोष्ट पुर्ण झालीच पाहीजे तरच आपण खूष असतो आणि त्यालाच सुख म्हणतो अस आपण मानतो.म्हणून त्या सुखाच्या शोधात आयुष्यभर भटकत असतो, लढत असतो आणि जर ते सहजासहजी मिळत नसेल तर ते दुसर्याला फसवून हिसकावून आणि ओरबाडून घेतो याला तुम्ही सुख म्हणता का,?
नाही …..
खर तर सुख म्हणजे “समाधान” असत.मानसिक समाधान जे पैशाने विकतही घेता येत नाही ,दिसतही नाही आणि दाखवताही येत नाही पण..ते असत प्रत्येकाकडे फक्त ओळखता आल पाहीजे आणि मानताही, ज्याला ते समजल तोच खरा सुखी 😊